शिंदे-फडणवीस सरकारकडून सर्वसामान्यांना "जोर' का 'झटका"

शिंदे-फडणवीस सरकारकडून सर्वसामान्यांना "जोर' का 'झटका"

---------------------------------------------------------------------------------
घरगुती वीज दरात वाढ करून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर टाकला दरोडा
---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) १ एप्रिल पासुन वीज दर महाग झाले आहेत. याचा परिणाम प्रत्येक घरावर होणार आहे. आता दर महिन्याला प्रत्येकाला वीज वापरासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे.हा निर्णय म्हणजे राज्यातील जनतेच्या खिशावर दरोडा टाकण्या सारखाच निर्णय आहे, घरगुती वीज दरात वाढ केली आहे, ती त्वरित रद्द करावी अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील जनतेला मोठा धक्का बसला आहे. १ एप्रिल पासुन वीज दर महाग झाले आहेत. याचा परिणाम प्रत्येक घरावर होणार आहे. आता दर महिन्याला प्रत्येकाला वीज वापरासाठी अधिक शुल्क भरावे लागणार आहे.

महाराष्ट्र वीज नियामक आयोग म्हणजेच MERC ने १ एप्रिल २०२३ पासून नवीन दर लागू केले आहेत. राज्यसरकारने व महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने घरगुती वीज दरात वाढ करून जनतेच्या खिशावर दरोडा टाकण्याचं काम केलं आहे, सध्या घरगुती गॅस,खाद्य तेल, पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडलेले आहेत आणि आता त्यात घरगुती वीजचे दर वाढवून राज्यसरकारने जनतेची अजूनच पिळवणूक केली आहे.

वीजचे दर कमी नाही केल्यास राज्यसरकारला त्याची खुप मोठी किंमत मोजावी लागेल, त्याचा त्यांनी विचार करावा, व वीज दरवाढीचा निर्णय त्वरित रद्द करावा अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.