पंढरपुर शहरात अवैद्य वाहतूक जोमात परवानगीपेक्षा जास्त प्रवासी भरण्याच्या प्रकाराकडे होतेय वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष..
-----------------------------------------------------------------------------------
रिक्षाचालकांकडून क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) : पंढरपुर शहरात रिक्षा चालकांची अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून, वाहतूक पोलिस आणि आरटीओचे दुर्लक्ष होत असून,$ रिक्षा चालकांनी नियम धाब्यावर बसविले आहेत. वाहतूक नियमन करणारे वाहतूक पोलिस चौकाचौकात तैनात असतात, परंतु रिक्षा चालक पोलिसांसमोरच परवानगीपेक्षा जास्त प्रवासी भरतात. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होताना दिसत आहेत.
रिक्षाचालकांकडून क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक
परवानगीपेक्षा जास्त प्रवासी भरण्याच्या प्रकाराकडे होतेय वाहतूक पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष
फक्त तीन सीट बसविण्याची परवानगी आहे.
रिक्षा चालकांनी स्वतःच्या रिक्षांवर 'तीन सीट परवाना' असे लिहिले आहे. तरीही नियमांचे उल्लंघन करून, चार ते सहा सीट घेऊन ते सुसाट धावतात. यापासून प्रवाशांच्या जीवाला धोका आहे. याचे भान रिक्षा चालकांना
पंढरपूर शहरातील अनेक मार्गावर राहिलेले नाही. रस्त्याने रिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. शासन नियमानुसार, रिक्षात अवैध व्यवसायासाठी चालकांना एवढी मोकळीक का मिळत आहे, हा खरा प्रश्न आहे.
शहरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर वायुवेग पथकाद्वारे धडक कारवाई होणार का जे कोणी रिक्षा चालक असे कृत्य करत असतील त्यांच्या वरती कारवाई केली जाणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
रिक्षा चालकांचा मनमानी कारभार नेहमीच असतो. तीन सीट परवाना आहे, तरीही चार सीट बसवतात. त्यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागतो. कधी- कधी लहान मुलांना रिक्षात उभे राहून प्रवास करावा लागतो. चालकाशेजारील सीटवरही प्रवासी बसवितात. तेव्हा जीव मुठीत धरून बसावे लागते.
------------------------------------------------------------------------------------
सिमा देवमारे , रिक्षा प्रवासी. रिक्षावाल्यांना ड्रेस कोड बॅच बिल्ला आधी कागदपत्रासह रिक्षा सर्वसामान्य सेवा देणे गरजेचे आहे.