वसंतराव( दादा )काळे यांच्या ८० व्या पुण्यतिथीनिमित्त धोंडेवाडी आयटीआय कॉलेज मध्ये आरोग्य शिबीर संपन्न...

वसंतराव( दादा )काळे यांच्या ८० व्या पुण्यतिथीनिमित्त धोंडेवाडी आयटीआय कॉलेज मध्ये आरोग्य शिबीर संपन्न...

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर  (पंढरी नगरी न्यूज ) धोंडेवाडी ता.पंढरपूर येथे वसंतराव (दादा) काळे यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त वसंतराव काळे आय टी आय कॉलेज, जनकल्याण नर्सिंग कॉलेज ANM व मुक्ताई नर्सिंग कॉलेज GNM यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .

यावेळी डॉ.आनंद कुलकर्णी (अस्थीरोग तज्ञ) व महाराष्ट्र राज्य अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान काळे यांच्या शुभहस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले‚ वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका मालन काकू काळे, संचालक  राजाभाऊ माने ‚ महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते बाळासाहेब काळे गुरुजी, वाडीकुरोली ग्रामपंचायतीच्या  सरपंच लाडाबाई काळे, वसंतदादा काळे मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा  संगीताताई काळे , मोनिका काळे ‚ डॉ. जयश्री शिनगारे ‚ सुनीता काळे मा. प्राचार्य शिवाजीराव बागल‚ प्राचार्य  ,दादासो खरात ‚ प्राचार्य ,शिवाजी शेंडगे ‚ प्राचार्य अनिल कोलगे, मुख्याध्यापक नंदकुमार दुपडे‚ प्राचार्य गीतांजली खाडे‚ मुख्याध्यापक संजय काळे उपस्थित होते यावेळी याप्रसंगी प्रास्ताविक डॉ. सुधीर शिनगारे व प्राचार्य संतोष गुळवे यांनी केले.
 
यावेळी बोलताना समाधान काळे म्हणाले की ,नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून शिक्षण घेऊन रुग्णांची सेवा आपल्या हातून घडते हे मोठे भाग्याचे काम आहे  तसेच आय टी आय विद्यार्थीनी व्यावसायिक शिक्षण घेऊन उद्योजक होऊन आपल्या संस्थेचे नाव लौकिक करावे यावेळी प्राचार्य शिवाजीराव बागल‚ संगीताताई काळे ‚ प्राचार्य दादासो खरात यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य संतोष गुळवे ‚ प्राचार्य काजी.एस.एम प्राचार्य अहिरसंग. एस.जे‚ उपप्राचार्य विद्या कुचेकर शिक्षक व शिक्षकक्तेर कर्मचारी, पालक‚ विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.समाधान काळे (सर) यांनी  व अनिल ननवरे सर यांनी आभार मानले.