*पंढरपुरात डॉ. पंडित दीनदयाल उपाध्याय यांना जयंती निमित्त अभिवादन:-*
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( प्रतिनिधी ):- भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि माणवता वादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आम. समाधान आवताडे म्हणाली की भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचे योगदान असणारे पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा पक्ष संघटनेतील राजकीय कार्यकर्ते व सामाजिक सेवाभावी कर्तव्य परंपरेला नेहमीच आदर्शवत ठरत असतात ते भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. त्याचबरोबर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचाही जनसंघाच्या पायाभरणीत मोठा वाटा असल्याचे आ. समाधान आवताडे यांनी सांगितले.
कार्यक्रमास प्रा.चांगदेव कांबळे. भाजपा तालुका अध्यक्ष भास्कर कसगावडे. नितीन कारंडे. दीपक येळे. बादल सिंह ठाकुर. श्रीधर म्हमाणे. प्रशांत सपणेकर. लक्ष्मण शिंदे. शैलेश आगवणे. विनोद लटके. भैय्या कळशे.भास्कर जगताप .प्रा.शरद चव्हाण. आबासाहेब पाटील. प्रसाद सातपुते. अमोल धोत्रे. पांडुरंग वाडेकर. राहुल गावडे. शशिकांत म्हेत्रे. तेजस कलुबमे. संजय पालकर. इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.