*तळसंगी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयात राजा राममोहन रॉय व कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी*
----------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा ( प्रतिनिधी):- तळसंगी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालय तळसंगी ता. मंगळवेढा या वाचनालयात राजा राममोहन रॉय व कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली. ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री रमेश बिचुकले म्हणाले की आज खरोखरच या दोन्ही महात्म्यांचा एकत्र जयंती आपल्या सर्वांच्या साक्षीने, सहकार्याने साजरी करताना मला खूपच हेवा, अत्यानंद होत आहे .
आम्हाला महाराष्ट्र राज्याच्या ग्रंथालय संचालनालयाच्या अध्यादेशाने राजा राममोहन रॉय यांची २५० वी जयंती महाराष्ट्र राज्यातील सर्व सार्वजनिक वाचनालय, ग्रंथालयांनी साजरी करावी व कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती योगायोगाने आल्याने एकत्र साजरी करण्यात आली.
यानंतर प्रभाकर गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आज खरोखरच या आपल्या वाचनालयात असे सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करुन नव्या पिढीला प्रेरणा व बळ देणारे आहे याचा मला अभिमान वाटतो याबद्दल वाचनालय प्रमुख व त्यांच्या सर्व सहकारी यांना धन्यवाद देतो आज राजा राममोहन रॉय यांनी महिला सक्षमीकरण , साक्षरता यासाठी तसेच महिला सतीची प्रथा बंद केली.महिला शिकला पाहिजे व त्यामुळे महिला टिकली पाहिजे.शिक्षणामुळे महिलाचा विकास कसा होतो हे त्यांनी पटवून दिले म्हणून त्यांना समाजसुधारकांचे 'जनक' म्हणून संबोधले जाते. दुसरे आपले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या घराघरापर्यंत,दारादारापर्यत पोहचवली. शिकला तर टिकला, वाचनाने आपल्या बुद्धीचा विकास होतो अन् मोबाईल वापरण्याने डोळे खराब होतात.
कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंदुस्थान बिचुकले म्हणाले की आज मी पण हे सर्व बघून भारावून गेलो आहे.कारण हे सर्व काय वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे तरी या पुढे पण आपण असेच कार्यक्रम राबवावे म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचे जनक होते. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, ध्येय आहे आणि वडाचे झाड ही ओळख ठेवून या झाडाला जेवढ्या पारंब्या आहेत तेवढ्या शाखा काढीन अन् आज त्याचं वटवृक्षात रुपांतर झाले.
सुत्रसंचलन सुभाष सुर्यवंशी यांनी केले. आभार दिलीप पाटील यांनी मानले. धुळा पांढरे,बिरा म्हारणूर, संतोष मुंगसे, आप्पा बिचुकले, भाऊसाहेब कानडे, महादेव कोळेकर, श़ंकर पाटील, महादराया पाटील, रतिलाल शिंदे, तानाजी मुंगसे, रविराज गायकवाड, अशोक म्हारणूर, महेश पाटील, हरिभाऊ बिचुकले, विजय म्हारणूर, ताजूक मुलाणी, सोन्या खांडेकर, भैय्या म्हारणूर, मल्हारी म्हारणूर, गोऱ्या टकले, रोहित शिंगाडे, शहाजी दिवसे व महिला सौ छाया पांढरे,सौ जक्कवा बिचुकले, सौ भारती गायकवाड,सौ जयश्री बिचुकले, सुनंदा पांढरे,सौ मिना लवटे,सौ गुणाबाई कारंडे, श्रीमती लताबाई दिवसे, श्रीमती विमलताई बिचुकले इत्यादी उपस्थित होते.*