महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वादाची सुनावणी ,आता १० जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता..

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वादाची सुनावणी ,आता १० जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता..

-------------------------------------------------------------------------------------

मुंबई( दै. पंढरी नगरी न्यूज) : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणाची सुनावणी १० जानेवारीपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.यापूर्वी १ नोव्हेंबर रोजी या प्रकरणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पार पडली होती.२९ नोव्हेंबरला सुनावणी होणं अपेक्षित होतं, पण यादिवशी सुनावणी टळली. हे प्रकरण १३ डिसेंबरला केवळ अनौपचारिक निर्देशांसाठी ऐकलं जाण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांवर निर्णय घेण्यासाठी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना करण्यात आली आहे.

१२ ते १६ डिसेंबर २०२२ या कालावधीत हिवाळी सुट्टीच्या आधीच्या आठवड्यात कुठलंही प्रकरण ऐकलं जाणार नाही, असं कालच सुप्रीम कोर्टानं जाहीर केलं आहे.त्यामुळे आता या प्रकरणावर निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.