पंढरपूर तालुक्यात अवैद्य वाळू उपसा प्रकरणी तलाठी व महसूल अधिकारी यांच्या विरोधात झाले आक्रमक आंदोलन..

पंढरपूर तालुक्यात अवैद्य वाळू उपसा प्रकरणी तलाठी व महसूल अधिकारी यांच्या विरोधात झाले आक्रमक आंदोलन..

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : तालुक्यातील भीमा व मान नदी पात्राच्या गावामधून राजरोसपणे बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक सुरू असून अवैद्य वाळू उपसा बंद करण्यात यावा या मागणीसाठी ठाकरे गटाचे युवा सेनेचे तालुकाप्रमुख योगेश चव्हाण यांनी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले.

तालुक्यातील गोपाळपूर, खरसोळी, चळे, सरकोली, तावशी, तरटगाव, ओझेवाडी, आंबे, शेगाव दुमाला, शिरढोण, पोहरगांव, कौठाळी, शेळवे, चिंचोली, इसबावी या गावांमधील नदीच्या पात्रातून वाळू माफिया कडून राजरोसपणे अवैद्य वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात आहे. याबाबत गेले अनेक दिवसापासून विविध संघटनांचे पदाधिकारी वारंवार महसूल विभागाकडे तक्रारी करीत आहेत पोलीस प्रशासन वाळू वाहतुकीवर कारवाई करत असल्याचे दिसत आहे. महसूल विभागाचे याउलट आहे. महसूल विभाग याकडे गांभीर्याने घेत नसून पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भीमा नदीच्या पात्रातील अवैद्य वाळू चोरी करून वाळू भरून टिपर जात असताना संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांनी  टिपर पकडून तहसील कार्यालया मधील गोडाऊनमध्ये कारवाई करण्यासाठी आणला असता तहसील मधील काही अधिकारी तसेच तलाठी व मंडल अधिकारी यांच्यामध्ये संबंधित टिपर (हायवा ) का पकडून आणला यावरून माझे- तूझे म्हणून महसूल अंतर्गत जोरदार एकमेकाची बाचाबाची ही झाल्याची चर्चा काल दिवसभर तहसील कार्यालयाच्या आवारात  होती. त्यामुळे तहसील महसूल प्रशासन हे संशयाच्या चौकशीत अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भीमा नदीकाठच्या गावामधून राजरोसपणे बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक सुरू आहे .बेसुमार वाळू उपशामुळे भीमानदी व माननदी पात्राचे मोठे नुकसान होत आहे. राजरोस पणे बेसुमार वाळू उपसा सुरू असून बेकायदेशीर वाळू उपशामुळे तालुक्यातील कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण झाला आहे .वाळू उपसा सुरू असताना महसूल प्रशासनाचे मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.

याबाबत ठाकरे गटाचे युवा सेनेचे तालुकाप्रमुख योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दि. ५ रोजी पंढरपूर येथील तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्या समवेत खळबळजनक आंदोलन केले, यावेळी अवैद्य वाळू उपशाला पाठीशी घालणाऱ्या संबंधित महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे पंचायत समिती बांधकाम कार्यालयातील अधिकारी विविध कामासाठी आलेले नागरिक हे  सुरू असलेल्या  गोंधळाकडे महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर संशयाने पहात होते. त्यानंतर युवा सेनेचे तालुकाप्रमुख योगेश चव्हाण व  कार्यकर्त्यांनी महसूल विभागाला लेखी निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली. कार्यवाही न झाल्यास विविध संघटना यांना बरोबर घेऊन आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा युवा सेनेचे तालुका पंढरपूर प्रमुख योगेश चव्हाण यांनी दिला आहे. त्यामुळे आर्थिक हित जोपासणारे महसूलअधिकारी तसेच वाळूतस्कर यांच्यामध्ये या कारणामुळे मोठी खळबळ उडाली आहे.