महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी पी. आर. पाटील
------------------------------------------------------------------------------------
पुणे (दै.पंढरी नगरी न्यूज) : राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष, सहकारी साखर कारखानदारीतील ज्येष्ठ नेते पी. आर. पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघच्या (मुंबई) अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.उपाध्यक्षपदी लोकनेते सुंदररावजी सोळंकी सहकारी साखर कारखानाचे (माजलगाव) अध्यक्ष प्रकाशराव सोळंकी व सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ यांची निवड झाली.
विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे-पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आदींनी अध्यक्ष, उपाध्यक्षांना शुभेच्छा दिल्या.मुंबई येथे निवडणूक निर्णय अधिकारी, मुंबई नगरीचे उपनिबंधक पी. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक झाली. विलासराव देशमुख साखर कारखान्याचे अध्यक्ष आबासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, प्रकाश आवाडे, नरेंद्र घुले-पाटील, आमदार बबनराव शिंदे, संत कुर्मदास साखर कारखान्याचे अध्यक्ष धनाजी साठे, शाहू साखर कारखान्याच्या (कागल) अध्यक्षा सुवासिनी घाटगे, आदिनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षा रश्मी बागल आदी संचालक उपस्थित होते. पवार यांची घोषणा अन् निवड दोन वर्षांपूर्वी पी. आर. पाटील यांचा शरद पवार यांच्या हस्ते कुरळप येथे अमृतमहोत्सवी सत्कार झाला. समारंभातच पवार यांनी त्यांची अध्यक्षपदी घोषणा केली. पवार यांनी दिलेला शब्द अखेर खरा केेला.
पी. आर. पाटील.राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी संधी दिली असून तिचे सोने करू. जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणुकीनंतर सर्वांना कुरळपला निमंत्रित करणार आहोत. कार्यकर्ते व हितचिंतकांनी शुभेच्छा देण्यास धावाधाव न करता, प्रचारात व्यग्र राहावे.