साखर निर्यातीचे धोरण स्पष्ट नसल्याने कारखानदार संभ्रमात
---------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर;( दै .पंढरी नगरी न्यूज ) - केंद्र सरकारने साखर निर्यातीचा कोटा जाहीर केला आहे. पण प्रत्येकाने किती साखर निर्यात करायची यांचे धोरण जाहीर न केल्यामुळे साखर कारखान्याच्या कारभाऱ्यान पुढे पेच निर्माण झाला आहे .
या संबंधी धोरणाच्या - निर्णयाकडे कारखानदाराचे लक्ष वेधून राहिलेआहे. केंद्र सरकारने दोन महिन्यापूर्वी ८० लाख टन साखर निर्यात करण्याचे धोरण जाहीर केले होते. यामुळे ओपन (खुली) जनरल लायसन्स या योजनेखाली सर्व साखर कारखान्यांना साखर निर्यात करता येणार आहे. गेल्या वर्षी कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सुमारे ४० लाख टन साखर निर्यात केली होती.
यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील २३ कारखाने सुमारे ४ लाख टनापर्यंत साखर निर्यात केली आहे .या निर्यातीतून मिळालेल्या महसुलामुळे कारखान्यांना तातडीने एफ.आर.पी देणे शक्य झाले आहे .या ही वेळी अशा संबंध संधीची साखर कारखानदार वाट पाहत आहेत .कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी एक रकमी एफ. आर. पी देण्याचे जाहीर केले आहे. मात्र कारखाना निहाय नोटिफिकेशन न निघाल्याने कारखानदार सध्या संभ्रमात आहेत.
साखर निर्यात धोरण जाहीर होणाऱ्या अपेक्षेवर हंगाम सुरू करण्याची तयारी केली आहे. पण नोटिफिकेशन अभावी उत्पादनाबाबत निर्णय घेणे साखर कारखाना दाराना कठीण झाले आहे. नोटिफिकेशन निघाले असते तर निर्यातीसाठी किती कच्ची साखर किती पक्की साखर तयार करायची हे स्पष्ट झाले असते त्या दृष्टीने नियोजन करता आले असते पण ते न झाल्याने साखर कारखानदार वेट & वॉच या भूमिकेत सध्या दिसत असल्याचे पहावयास मिळत आहे.