शेळवे येथे परमेश्वर आसबे यांच्या वाढदिवसा निमित्त महाआरोग्य शिबिर
_____________________________________________________
पंढरपूर (प्रतिनिधी )– शेळवे ता.पंढरपूर येथे महाआरोग्य शिबिरात गावातील स्त्री-पुरुष दोघांच्याही तपासण्या करण्यात आल्या. सदर आरोग्य तपासणी शिबिरामध्ये रक्ताच्या संपूर्ण चाचण्या महा लॅब च्या वतीने घेण्यात आल्या.
यावेळी डॉ सौ स्वाती बोधले मॅडम स्त्री रोग व प्रसूती तज्ञ उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर,डॉ.बालाजी बिराजदार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डी,डॉ.अभिजीत नामदे डी एन बी मेडिसिन, डॉ.अभिजीत रेपाळ वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र भाळवणी,डॉ.विनय मुसळे वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद आयुर्वेदिक दवाखाना शेळवे आदीं उपस्थित होते.
शेळवे च्या सरपंच सुनीता अनिल गाजरे, ग्रामपंचायत सदस्या शर्मिला परमेश्वर आसबे, मंगल अर्जुन आसबे,इंदुमती मारुती गाजरे, जस्मिन जावेद मुलाणी, अफसाना नबीलाल शेख, माजी सरपंच गोकुळा उमेश भोसले, पोलीस पाटील ॲड नवनाथ पाटील, ॲड सुधाकर मोहन गाजरे ,सागर माणिकराव गाजरे ,आय आय टी कम्प्युटरचे नितीन आसबे,आरोग्य केंद्राचा संपूर्ण स्टाफ , भंडीशेगाव उपकेंद्राचा संपूर्ण स्टाफ आणि शेळवे आरोग्य केंद्रातील संपूर्ण स्टाफ व सर्व आशा सेविका यांनी सहकार्य केले.
सदर कार्यक्रमांमध्ये गावातील २१० महिला व पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश भोसले, माऊली आसबे, राजेंद्र आसबे ,किरण गाजरे, ग्रामपंचायत कर्मचारी,कृषी विद्यालयाचे कर्मचारी,जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.सदर शिबिराचा लाभ शेळवे, भंडीशेगाव, खेड भाळवणी,वाडी कुरोली ,पिराची कुरोली परिसरातील लोकांनी घेतला.