डॉ. सुरेखा वाघ यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती बोध पुरस्कार जाहीर..
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) : पंढरपूर तालुक्यातील चळे येथील नामांकित डॉ. सुरेखा वाघ यांना समर्थ सोशल फाउंडेशन व जनरल हॉस्पिटल व न्यूट्री फील हेल्थ कोल्हापूर या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सन २०१५ पासून व्यसनमुक्ती मधुमेह मुक्ती, रोग मुक्ती ,वेदना मुक्ती अभियान राबवली अंतर्गत दिला जाणारा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूध पुरस्कार सन- २०२३ साठी डॉ.सुरेखा औदुंबर वाघ कोल्हापूर यांना जाहीर करण्यात आला आहे .
संस्थेच्या मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून व्यसनी व मधुमेह असणाऱ्या लोकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांना होणाऱ्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्याचे काम वाघ यांनी केले आहे, शेकडो केंद्र दर्गापैकी या केंद्रधारकाचे काम उत्कृष्ट आहेत. अशा केंद्रधारकांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सूचित सन्मान केला जातो.
देशभरातील लाखो लोकांना प्रबोधन करून मधुमेह मुक्तीसाठी प्रयत्न करून कुंटूबियांना नव संजीवनी देऊन समाजात एक आदर्श निर्माण करणाऱ्या केंद्रधारकाचा लवकरच भव्य पुरस्कार वितरण सोहळा सन्मान आयोजित करून अनेक मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.डॉक्टर सुरेखा वाघ यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यभरातून अभिनंदनचा वर्षाव होत असून त्यांचे कौतुक केले जात आहे.