नवोदय विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी

नवोदय विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी

___________________________________________________

तुळजापूर (दै.पंढरी नगरी न्यूज) तुळजापूर येथीलजवाहर नवोदय विद्यालय मंगळवार दिनांक ११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य श्री. गंगाराम सिंह व विद्यार्थी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांनी संपूर्ण महाराष्ट्रात महिला शिक्षणाची मुहूर्त मेढ महात्मा फुले यांनी कशी रोवली तसेच  सत्यासाठी आपला देह कसा झिजवला. एक थोर विचारवंत ,लेखक, बहुजनांचे उद्धारक, अस्पृश्यता निवारण यासाठी उक्ती आणि कृती यांचा  यांचा समन्वय साधून महात्मा फुले यांनी रायगडावरती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून प्रथम शिवजयंती कशी साजरी केली. हे वेगवेगळे प्रसंग सांगून महात्मा फुले यांचे कार्य कसे अलौकिक होते हे सांगितले तर त्यांच्या कार्याचे सर्व विद्यार्थ्यांनी अनुकरण करावे करावे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरी जाधव सर यांनी केले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.