संभाजी ब्रिगेड आयोजित व मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समिती आज पारितोषिक वितरण सोहळा समारंभ

संभाजी ब्रिगेड आयोजित व मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समिती आज पारितोषिक वितरण सोहळा समारंभ

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्युज ) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ जयंती निमित्त संभाजी ब्रिगेड पंढरपूर आयोजित  व मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होती जयंतीनिमित्त पंढरपूर  शहर भगवेमय झाले होते.

आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेमध्ये सहभागी तसेच यश संपादन केलेल्या सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान आज दि. सोमवार २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता करण्यात येणार असल्याची माहिती मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने देण्यात आली.

तरी सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संभाजी ब्रिगेड व मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सोहळा समिती पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत आहे .कार्यक्रमाचे ठिकाण जिजामाता उद्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक पंढरपूर येथे करण्यात आले आहे.