शिवसेनेचे आमदार; नितीन देशमुख यांनी घेतले श्री .विठ्ठल रुक्मिणीचे सहपत्नीक दर्शन
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) रविवार दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे बाळापूर मतदार संघाचे विद्यमान आमदार श्री. नितीनजी देशमुख यांनी सहकुटुंब श्री. विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

त्यावेळी श्री .विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आमदार श्री .नितीनजी देशमुख यांचा सत्कार मंदिरे समितीचे सदस्य व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग श्री .संभाजी शिंदे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा उपरणे व दैनंदिनी देवून सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.
