पांडुरंग साखर कारखाना उसाचा पहिला हप्ता २८०० रुपये जाहीर – चेअरमन प्रशांत परिचारक श्री पांडुरंग साखर कारखाना ऊस दराबाबतीत अग्रेसरच राहणार
------------------------------------------------------------------------------------
श्रीपूर ( पंढरी नगरी न्यूज ) माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता प्रती टन 2800 रुपये दर देणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी जाहीर केल्याने हा दर म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील इतर साखर कारखानदारांची झोप उडणार दर असल्याचे ऊस उत्पादक शेतकरी बोलत आहेत वाखरी येथील कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमांमध्ये प्रशांत परिचारक यांनी उसाचा पहिला हप्ता 2800 इतका जाहीर केला.

तसेच 16 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत उशिराने येणाऱ्या उसास आगाऊ 50 रुपये प्रति मॅट्रिक टन धरून 2850 इतका पहिला हप्ता देण्यात येणार आहे. तसेच एक फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारी पर्यंत उशिराने गाळप होणाऱ्या उसात शंभर रुपये प्रति मॅट्रिक टन आगाऊ धरून 2900 रुपये पहिला हप्ता देण्यात येणार आहे.तसेच 01 मार्चपासून पुढे उशिराने येणाऱ्या उसास 150 रुपये ज्यादा धरून 2950 इतका पहिला हप्ता देण्यात येणार आहे.यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला व चेअरमन, संचालक व आधिकरी यांचे आभार मानले.
