खेडभोसे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांचा दारूबंदीचा निर्णय, या अगोदरही चार वेळा ग्रामसभेच्या ठरावाला पोलिसांनी दाखवली केराची टोपली, ग्रामस्थाचा सभेत गंभीर आरोप..?

खेडभोसे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांचा दारूबंदीचा निर्णय, या अगोदरही चार वेळा ग्रामसभेच्या ठरावाला पोलिसांनी दाखवली केराची टोपली, ग्रामस्थाचा सभेत गंभीर आरोप..?

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्युज) पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून वैतागलेल्या ग्रामस्थांनी थेट उपविभागीय पोलिस अधिकारी अर्जुन भोसले आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना निवेदन देऊन अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी केली आहे.

खेडभोसे ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच सुरेखा देवळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी उपसरपंच अश्विनी पवार, तलाठी प्रकाश भिंगारे यांच्यासह माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

यावेळी गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचा ठराव कल्याणराव काळे सोसायटीचे चेअरमन बंडू पवार यांनी मांडला. त्यास ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पवार यांनी अनुमोदन दिले. ग्रामस्थांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याबाबत ग्रामपंचायतीने करकंब  पोलिसांना गावात संपूर्ण दारूबंदी केली असल्याबाबत पत्र पाठवले आहे. आता करकंब पोलीस काय भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
करकंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू हे ग्रामस्थांना पावणार की ?अवैधंदेवाल्यांना आशीर्वाद देऊन  तारणार ? खास चर्चा*
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
खेडभोसे गावात खुलेआम अवैध दारू विक्री केली जात आहे. याबाबत ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेक वेळा दारूबंदीचा ठराव केला होता, तसे पत्रही करकंब पोलिसांना देऊन या दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र पोलिसांकडून एकदाही या दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली नसल्याने ग्रामस्थातून बोलले जात आहे. संबंधित करकंब पोलीस स्टेशनचे अधिकारी संबंधित विभागाचे कर्मचारी ही या गोष्टीकडे संपूर्णता दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे.