मारापूर येथील शरदचंद्र कृषी विद्यालयाचा निकाल १०० टक्के

मारापूर येथील शरदचंद्र कृषी विद्यालयाचा निकाल १०० टक्के

------------------------------------------------------------------------------------
          
मंगळवेढा( पंढरी नगरी न्यूज ) मारापुर ता.मंगळवेढा येथील शरदचंद्र कृषी विद्यालयामधील दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल100 टक्के लागला.ऋतुजा सुखदेव माने या विद्यार्थिनीने 91.60% गुण मिळवत प्रशालेत प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. प्रशालेतील समीक्षा दासू वाघमारे हिने 91.45 टक्के गुण मिळवीत द्वितीय व अमृता तानाजी वैजनाथ हिने 87.6% गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे. दहावी बोर्ड परीक्षेत एकूण 26 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील 16 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत तर 09 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
      
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा विद्यालयाच्या वतीने माणगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व मारापूरचे  सरपंच विनायक यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आला.याप्रसंगी मुख्याध्यापक संजय फुगारे सर,माजी सरपंच भगवान आसबे, उपसरपंच अशोक आसबे, आबा जानकर , भुजंगराव आसबे, सत्यवान यादव, पिंटू मांडवे, संतोष गांडूळे, नाथा माने, विक्रम यादव, अनिल माने, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.