सोलापूर विद्यापीठ सिनेट पदासाठी मा.गणपत मोरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
* मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण * -----------------------------------------------------
सोलापूर (प्रतिनिधी) सोलापूर येथील अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर सन 2022 विद्यापीठाची सिनेट पदाची निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून या पदासाठी गणपत मोरे सर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केल्यामुळे पदवीधर मतदार मध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून सर्वत्र त्यांचे स्वागत केले जात आहे .
पंढरपूर तालुक्यातील मौजे गादेगाव येथील सर्वत्र परिचितअसलेले शिवरत्न इंग्लिश मेडीयम स्कूल या संस्थेचे संस्थापक असलेले गणपत मोरे सर हे विद्यार्थिदशेपासून राजकारण .समाजकारणाची आवड असल्याने ते सध्या गादेगाव ग्रामपंचायतीची उपसरपंच म्हणून काम पाहत आहेत. सोलापूर विद्यापीठाच्या गेल्या निवडणुकीच्या वेळी सिनेट पदाच्या वेळी त्यांच्या पत्नी वर्षाराणी गोडसे -- मोरे यांनी सिनेट पदासाठी अर्ज भरून विद्यापीठाच्या निवडणुकीत चांगलेच वातावरण तापले होते, झालेल्या या निवडणुकीत थोड्याफार फरकाच्या मताने त्यांचा निसटता पराभव झाला होता. तेव्हापासून ते पदवीधर मतदारांच्या कायम संपर्कात होते. मागील काही दिवसापासून त्यांच्या माध्यमातून विद्यापीठ पदवीधर नोंदणीमध्ये सगळ्यात ते आघाडीवर असल्याचे मतदारातून बोलले जाते. त्यांनी आतापर्यंत आठहजार मतदारापर्यंत पोस्टकार्ड च्या माध्यमातून पोचल्याचा दावा ते करीत आहेत. त्यामुळे आपला विजय हा निश्चित आहे अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे म्हणून आपण या पदासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी सोलापूर जिल्ह्यात राजकीय व सामाजिक सहकाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण केले. त्यामुळे गेल्या निवडणुकीतील अनुभव व मोठ्या प्रमाणात असणारे पाठबळ यामुळे या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचे सांगितले. उमेदवारी अर्ज भरतेवेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत. सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे. जिल्हा सचिव सुहास टोनपे. नितीन कोकाटे मोहोळ. मनसेचे नेते अनिल बागल. सोलापूरचे नगरसेवक तांबोळी. यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपत मोरे यांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्याच बरोबर त्यांच्या पत्नी वर्षाराणी गोडसे मोरे दुसऱ्यांदा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.