गादेगांव येथील शेतकऱ्यांचा मुलगा मंत्रालयात सहाय्यक पदी निवड : अक्षय शिंदे च्या निवडीने गावात ऊसाहाचे वातावरण
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मंडळ यांच्याकडून सन 2020-22 मध्ये घेण्यात आलेल्या सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय संयुक्त गट क्रमांक दोन गट क्रमांक परीक्षेमध्ये खुल्या प्रवर्गातून पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील अक्षय बाळासाहेब शिंदे यांची मंत्रालयात महसूल साहेब पदी निवड झाली आहे अक्षय शिंदे यांचे वडील बाळासाहेब शिंदे हे अंबिकामाता सार्वजनिक वाचनालयात ग्रंथपाल म्हणून काम पाहत असून गरीब कुटुंबातील शेतकरी आहेत. अक्षय शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गादेगाव येथे तर दहावीपर्यंतचे शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गादेगाव येथे झाले आहे त्यांनी अभियांत्रिकी शाखेमधून पदवी प्राप्त केली आहे .त्यांच्या निवडीने गादेगांव व परिसरात नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे. अक्षय शिंदे यांची निवड झालेबद्दल ग्रामस्थांच्या वतीने स्वागत कर सत्कार करण्यात आला.
यावेळी भारत बागल ,पद्माकर बागल, प्रभाकर बागल ,शिवाजी पाटील ,सोमनाथ भोसले तसेच गादेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच ,सदस्य गावातील विविध संस्थांचे आजी - माजी पदाधिकारी यांनी अक्षय शिंदे यांचे अभिनंदन केले आहे . कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.