पंढरीत अनेक लाॅज मधून खुलेआम वेश्याव्यवसाय पोलीस प्रशासन विभागाची डोळेझाक कायम

पंढरीत अनेक लाॅज मधून खुलेआम वेश्याव्यवसाय  पोलीस प्रशासन विभागाची डोळेझाक कायम

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ): भारताची दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या पंढरपूर तीर्थक्षेत्र परिसरात तसेच पंढरपूर शहराला जोडणारे सर्व रस्त्यांवरील दोन ते तीन कि मी अंतरावर असणाऱ्या अनेक लाॅजमधून वेश्याव्यवसाय अवैधपणे खुलेआम सुरु केला जात आहे.पंढरपूर शहर व तालुकाभरात भाविक व नागरिकांना राहण्यासोयीसाठी शेकडो हॉटेल्स तसेच लाॅज कार्यरत आहेत.मात्र या लाॅजच्या माध्यमातून अनेक ठिकाणी रोजरासपणे व खुलेआम  अवैध वेश्याव्यवसाय चालू असल्याचे  दिसून येत आहे.सर्वसामान्यांना हे सर्व दिसत असले तरी पोलीस प्रशासन विभागाकडून यावर कोणतेही कारवाई न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने त्यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.अशातच या विभागाचे गृह मंञी देवेंद्र फडवणीस हे अतिशय कार्यक्षम समजले जात असले तरी पंढरीत या विभागाच्या भोंगळ कारभारामुळे राज्य सरकारचीही बदनामी होताना दिसत आहे.
         
पंढरपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्र व संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे.या ठिकाणी महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशभरातून दरवर्षी लाखो भाविक पंढरीच्या पांडुरंगासाठी भेटीला येत असतात.त्यामुळे इथे अनेक सोयी सुविधा देण्यासाठी राज्य सरकार कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च करत असते.मात्र असे असले तरी अवैध वेश्याव्यवसायचे प्रमाणही या शहरात मोठ्या प्रमाणात बळवताना दिसत आहे. यामधीलच एक प्रमुख अवैध धंदा म्हणजे वेश्याव्यवसाय केला जात आहे. मात्र तरीही पोलीस प्रशासन विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे हा वेश्याव्यवसाय पंढरी नगरीत मोठ्या जोमात सुरु आहे.  पंढरपुर शहर व तालुक्यासह पोलीस प्रशासन विभागाच्या मर्जीने व आशीर्वादाने पंढरपूर तालुक्यातील शेकडो लाॅज मध्ये आज खुलेआम अवैध वेश्याव्यवसाय चालू असलेला दिसत आहे.मात्र पोलीस प्रशासन विभागाकडून कसलीच कारवाई होत नसल्याने या लाॅज व्यवसायिकांशी पोलीस प्रशासन विभागाचे हितसंबंध गुंतलेले आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

राज्य सरकार गंभीर दखल घेणार का ?

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे सरकार अस्तित्वात आल्यापासून राज्यात अनेक धडाकेबाज निर्णय घेण्यात आलेले आहेत.यामध्ये अवैध वाळूसह अनेक अवैध धंद्यांना लगाम घालण्याचे कामही या सरकारमधील मंत्र्यांकडून करण्यात आलेले आहे.मात्र संपूर्ण भारताची दक्षिणकाशी अशी ओळख असलेल्या पंढरीतच अनेक लाॅजमध्ये अवैधपणे उघड उघड वेश्याव्यवसाय होत असल्याने सरकारचीही बदनामी होताना दिसत आहे.त्यामुळे याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करणाऱ्या पोलीस प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काही कारवाई करणार का?तसेच या अवैध वेश्याव्यवसायला लगाम घालून पंढरीची होणारी बदनामी थांबवणार का असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक व भाविकांमधून उपस्थित केला जात आहे?