यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत राजकारणाचा पाया घातला - दत्ता सरगर
---------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज) : मंगळवेढा - यशवंतराव चव्हाण हे राजकारण, प्रशासन आणि, चांगुलपणा यातील सहयाद्री पर्वत आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी प्रशासनाला 'होय' म्हणायला, शिकले पाहिजे असा सल्ला दिला होता. त्याच्या या सल्ल्याचा रोहित भगरे यासारख्या नवीन अधिकाऱ्यांनी पुढील कामकाजामध्ये उपयोग करावा असे प्रतिपादन न.पा. मंगळवेढ्याचे मुख्याधिकारी निशिकांत परचंडराव यांनी केले.
महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंतीनिमित्त स्व. संजय- सविता स्मृती सार्वजनिक वाचनालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रारंभी यशवंतराव चव्हाण याच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या, हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निशिकांत परचंडराव व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. दत्ता सरगर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांनी केले. याप्रसंगी एम.पी.एसस्सी च्या निकालात राज्यात दहावा क्रमांक प्राप्त रोहित भगरे व त्यांच्या मातोश्रीचा सत्कार शाल, गुलाबपुष्प व ग्रंथभेट देऊन करण्यात आला. शिवाजी विद्यापीठाची 'विद्यावाचस्पती' (डॉक्टरेट) पदवी प्राप्त डॉ. दत्ता सरगर, कवचाळे प्रतिष्ठानचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त गणेश यादव यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती रोहित भगरे यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केले की स्पर्धा परीक्षा देण्यासाठी इच्छाशक्ती फार महत्वाची असते. आपले स्वप्न पूर्ण करणे हे आपले ध्येय ठेवायला हवे. माझ्या यशात माझे शिक्षक व आईवडिलांचा सिंहाचा वाटा आहे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे व्याख्याते दत्ता सरगर यांनी आपल्या महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण या व्याख्यानात यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व स्वातंत्र्याच्या आंदोलनाने संस्कारित झाले होते . त्याग , देशप्रेम , समाजसेवा , सत्याग्रह गांधी विचारांचा संस्कार यामुळे त्यांनी आयुष्यात पुढील काळात याच मूल्यांचे जतन केले . त्यांनी कधीही कुरघोडीच राजकारण केले नाही . चारित्र्यसंपन्नता , नैतिकता आणि सुसंस्कृतपणा आशा राजकारणाचा पाया घालण्याचं काम यांनी केलं . त्यांचे मन संवेदनशील होते . आशा संवेदनशील मनाने महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया भक्कमपणे रचला म्हणूनच आज महाराष्ट्र हा शेती , शिक्षण, सहकार , साहित्य आणि उद्योग या क्षेत्रामध्ये आघाडीवर असलेले राज्य दिसून येत कोयना , उजनी , प्रवरा या धरणांची निर्मिती , भूविकास बँक , जिल्हा मध्यवर्ती बँक , शेतकरी सोसायटी यातून अर्थ पुरवठा , शिवाजी विद्यापीठ डॉ . बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ , अनेक साखर कारखान्यांना केलेले अर्थ सहाय्य एम् . आय.डी. सी ची निर्मिती या आणि आशा विविध अंगांणी यशवंतरावांनी कार्य केले.
कार्यक्रमास मंगळवेढा वकील संघाचे अध्यक्ष अँड उल्हास माने , भारत मासाळ , सचिन गालफाडे , गणेश यादव ,भिमराव घुले , संतोष लाड , माजी नगर सेवक महादेव जिरगे , संतोष एणपे व वाचक वर्ग उपस्थीत होता . वाचनालयाचे उपाध्यक्ष संतोष गायकवाड , सतीश आवताडे , धर्मराज जाधव , दामाजी गोवे , ग्रंथपाल प्रतिभा गायकवाड , संतोष गायकवाड , ऋषीकेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले . करिक्रमाचे आभारप्रदर्शन वाचनालयाचे सहकार्यवाह धर्मराज जाधव यांनी केले .