देगांव येथील भीमा नदीच्या पात्रात वाळू तस्करांचा वाळूवर डल्ला
---------------------------------------------------------------------------------
नेमण्यात आलेली दक्षता पथके गायब,अंमलबजावणी कागदावर
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर तालुक्यातील सर्व दृष्ट्या सदन असलेल्या देगांव येथील भीमा नदीच्या पात्रातील वाळू तस्कर वाळूचा उपसा व चोरटी वाहतूक पंढरपूर शहराच्या अगदी हकेच्या अंतरावर वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी होत असून महसूल प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यातील वाळू तस्कर हे मजोर झाले असून ते उन्माद पणाने वागत आहेत, वाळूची तस्करी करण्याकरता महसूल विभाग सहकार्य करीत असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे दिसत आहे ,कारण एकीकडे कारवाई केल्याचा दिखावा दाखवायचा आणि दुसरीकडे वाळू तस्करांना सवलत देऊन सोडून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे हा नियम महसूल विभाग करीत असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे .
त्यामुळे मी मारल्यासारखे कर तू रडल्यासारखे करतो अशी मन महसूल विभागाकडून होत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे ,मागील काही दिवसापूर्वी गुरसाळे येथील बंधाऱ्याची संबंधित वाळू तस्कराकडून बंधाऱ्याचे दरवाजे काढले असल्याची चर्चा ताजी असतानाच तसेच पंढरपूर नदीच्या पात्रात आंघोळी करिता परगावहून आलेले दोन भाविकांना खोल खड्डे असल्यामुळे त्यांना खड्ड्याचा व पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्यांना आपला जीव गमावा लागल्याचे ताजे उदाहरण आहे.
त्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील वाळू तस्कर हे मजोर झाले असून ते उन्माद पणाने वागत आहेत .देगाव - पंढरपूर या ठिकाणी असलेली वाळूही चांगल्या दर्जाची असल्याने वाळू चोर हे दिवसाढवळ्या अवैध व्यवसाय करीत असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे निसर्गरम्य अशा वसलेल्या विठुरायाच्या पंढरीचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही तसेच कुणी वंदा कोणी निंदा अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या तस्कराकडे दुर्लक्ष करण्याचा हा आमचा नेहमीचा महसूल विभागाचा धंदा अशी म्हण लागू होत आहे तरी अवैध व्यवसायाकडे वरिष्ठ अधिकारी कधी दखल घेणार का ?याचीच चर्चा पंढरपूर शहर व तालुक्यात सर्वत्र होत आहे.