श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीस सातारा येथील भाविकांकडून अन्नदानासाठी ५०१०००/- रुपयाचा धनादेश ..

श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीस सातारा येथील  भाविकांकडून अन्नदानासाठी ५०१०००/- रुपयाचा धनादेश ..

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) सातारा येथील बजरंग बाबुराव बाचल सदर बाजार, हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त, विठ्ठलावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. आपल्या हातून विठ्ठलाची सेवा घडावी अशी त्यांची तळमळ आहे. त्यामुळं आज सह कुटुंब सहपरिवार दर्शनाला आले असता त्यांनी दरवर्षी प्रमाणे अन्नछत्र साठी ५०१०००/- रुपयाचं धनादेश विठ्ठल रुक्मिणी मंदिरास दिला. आपल्या हातून अन्नदान घडाव ही त्यांची इच्छा.

त्यांचा सत्कार मंदिर समितीचे लिपीक श्री योगेश रमेश कागदे यांच्या हस्ते देवाचे उपरणे, दैनंदिनी, आणि श्रींची प्रतिमा देऊन करण्यात आला.