*मंगळवेढा येथे शुक्रवारी दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयाचा वर्धापन दिन व भूमिपूजन सोहळा...*

*मंगळवेढा येथे शुक्रवारी दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालयाचा वर्धापन दिन व भूमिपूजन सोहळा...*

-------------------------------------------------------------------------------- 
संस्थेचे सहसचिव श्रीधर भोसले यांनी दिली माहिती 
--–---------------------------------------------------------------------------- 
मंगळवेढा (प्रतिनिधी):- शिक्षण प्रसारक मंडळ मंगळवेढा संचलित दलित मित्र कदम गुरुजी सायन्स कॉलेज मंगळवेढा या महाविद्यालयाचा वर्धापन दिन सोहळा तसेच महाविद्यालयाच्या नूतन वास्तूचा भूमिपूजन समारंभ शुक्रवार दिनांक 16 रोजी सकाळी साडेदहा वाजता करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सहसचिव श्रीधर भोसले सर यांनी दिली. सदर कार्यक्रम राज्यसभेचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक यांच्या हस्ते तर शिक्षण प्रसारक मंडळ मंगळाच्या संचालिका डॉक्टर मीनाक्षीताई कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम, संचालिका तेजस्विनी कदम, सचिव प्रियदर्शनी महाडिक, अध्यक्ष सुजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी सदर कार्यक्रमास विद्यार्थी व शिक्षण प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सहसचिव श्रीधर भोसले सर यांनी सांगितले.