वडीलाच्या डोक्यात फरशी घालून सख्या मुलांनेच केला खून केल्याची घटना !
--------------------------------------------------------------------------------------
दिवाळीच्या सणा दिवशीच हा प्रकार घडल्याने सगळीकडे हळहळ
--------------------------------------------------------------------------------------
सोलापूर प्रतिनिधी : दारू पिऊन आई सहकुटुंबातील सदस्यांना त्रास देणाऱ्या वडिलांच्या डोक्यात फरशी घालून सख्ख्या मुलानेच खून केल्याची धक्कादायक घटना सोलापुरातील एमआयडीसी परिसरात घडली आहे.
आकाश बसवराज गवंडी असं खून करणाऱ्या मुलाचं नाव आहे. हत्त्यानंतर अवघ्या काहीही तासातच पोलिसांनी त्याला सोलापूर रेल्वे स्टेशन वरून ताब्यात घेतलं आहे, आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
संशयित आरोपी आकाश आणि त्याचे वडील बसवराज गवंडी हे दोघेही ठेकेदाराकडे मिस्त्री म्हणून कामाला जात असत. मयत बसवराज यांना दारूचे व्यसन होते. तर मुलगा आकाश हा देखील मद्यपान करायचा. घरी रात्री जेवण करून झोपल्यानंतर घरामध्ये कोणीही नाहीये हे लक्षात येताच आकाशने वडिलांच्या डोक्यात फरशी घातली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आकाश रात्रभर वडील मयत बसवराज यांच्या जवळच झोपी गेला. त्यानंतर मात्र तो सोलापूर सोडण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्याला रेल्वे स्टेशन परिसरातून तात्काळ जेरबंद केले. या घटनेमुळे ऐन दिवाळीत सोलापूरकरांना हेलावून टाकलं आहे.