सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक को आँप .असोसिएशनच्या संचालक पदी कल्याणराव काळे यांची निवड..

सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक को आँप .असोसिएशनच्या संचालक पदी कल्याणराव काळे यांची निवड..

-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज) : सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक ऑपरेटिव्ह असोसिएशन सोलापूरच्या संचालक पदाची पंचवार्षिक निवडणूक होऊन या निवडणुकीत सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे नेते तथा वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे हे अटीतटीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. कल्याणराव काळे यांना ३० पैकी २७ मते मिळाली असून ते विजय झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी हे गावडे यांनी जाहीर केले .कल्याणराव काळे हे पंढरपूर येथील निशिगंधा सहकारी बँकेचे विद्यमान चेअरमन असून त्यांच्या विजयाबद्दल पंढरपूर शहर तालुका जिल्ह्यामधून त्यांचे अभिनंदन होत आहे.