विकृतीचा कळस! वडिलांनी आणि काकांनी झाडाला लटकवून केली मुलीची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न..

विकृतीचा कळस! वडिलांनी आणि काकांनी झाडाला लटकवून केली मुलीची हत्या; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न..

-------------------------------------------------------------------------------------

जालना( दै.पंढरी नगरी न्यूज) : जालन्यात अंत्यत धक्कादायक प्रकार समोर आला आहे, मुलीगी पळून गेली म्हणून काका आणि वडीलांनीतीला झाडाला लटकून तिती हत्या केलीची घटना समोर आली आहे.ही घटना मंगळवारी घडल्याची समजले आहे. हा प्रकार करताना कुटुंबातील कोणीही या कृत्याला विरोध केला नाही. गावातील कोणीतरी पोलीस ठाण्यात माहिती दिली आणि पोलिसांनी तात्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला. ही घटना जालना तालुक्यातील पिरपिंपळगावची आहे. पीडित मुलगी तिचा दूरचा नातेवाईक आणि तिचा प्रियकर असलेल्या मुलासह घरातून निघून गेली होती. लग्न करून देतो असे सांगून तिच्या वडिलांनी तिला परत बोलावले.

तीन दिवसांनंतर, मुलगी घरी परतली. तिच्या लग्नाची सर्व तयारी आजूबाजूच्या मर्यादित नातेवाईकांसह केली गेली होती. मात्र, लग्नापूर्वी तिचे वडील संतोष सरोदे आणि काका नामदेव सरोदे यांनी तिला मंडपातून घराजवळील झाडावर ओढून नेले. त्यानंतर त्यांनी तिच्या गळ्याला दोरी बांधून तिला झाडाला लटकवले.

या सर्व प्रकारानंतर त्यांनी तिला खाली उतरवून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जाळली आणि त्यानंतर सायंकाळी त्यांनी तिची राख एका पिशवीत टाकली. समाजात बदनामी होऊ नये म्हणून मुलीच्या वडिलांनी आणि काकांनी तिची हत्या केली. मुलीने आत्महत्या केल्याचे दाखवण्यासाठी हा सर्व प्रकार करण्यात आला.