श्री.विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीला कार्तिकी यात्रेत तीन कोटी वीस लाख रुपये उत्पन्न...
-------------------------------------------------------------------------------------
मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांची माहिती..
-------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज ) : कार्तिकी यात्रेत विठ्ठलाच्या चरणी तीन कोटी वीस लाख अर्पण गतवर्षीच्या तुलनेत यंदा मंदिर समितीला एक कोटी वीस लाख रूपयांचे अधिक उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे.
गरीबांचा देव अशी ओळख असलेल्या पंढरपूरच्या विठुरायांची श्रीमंती वाढू लागली आहे. कार्तिकी यात्रे दरम्यान विठुरायाच्या खजिन्यात रोख रकमेबरोबरच सोन्या चांदीच्या दागिन्यांची ही मोठी भर पडली आहे. कार्तिकी यात्रे दरम्यान पंढरपूरातील रुक्मिणी मंदिर समितीला तीन कोटी वीस लाख ५९ हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये भक्तनिवास, लाडू प्रसाद, देणगी पावती, दागिने , देवाच्या चरणी भाविकांनी अर्पण केले आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा मंदिर समितीला एक कोटी वीस लाख रूपयांचे अधिक उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिर समितीकडून देण्यात आली आहे. कोरोना काळात मंदिर दोन वर्षे बंद होते. त्यामुळे मंदिराच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती कार्तिकी यात्रा काळात मंदिर समिती व महसूल विभाग ग पोलीस प्रशासन व इतर विभाग यांच्यावतीने वारकऱ्यांची यात्रा काळात चांगली सोय व्हावी त्यादृष्टीने चांगल्या पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते त्यामुळे यात्रा काळात कोणतीही विठ्ठल भक्ताची कोणतीही गैरसोय व अनुचित प्रकार झाला नसल्याने कार्तिकी यात्रा चांगल्या पद्धतीने पार पडली अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.