राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई..!
------------------------------------------------------------------------------------
सोलापूर( दै. पंढरी नगरी न्यूज) राज्य उत्पादन शुल्क विभागाने १६ महिन्यात हातभट्टी दारू सुमारे सव्वा सात कोटीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सोलापूर जिल्हा उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक यांनी दिली. दिनांक १ ऑगस्ट २०२१ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत नैवेद्य दारूवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली होती .
यामध्ये कंटेनर टेम्पो रिक्षा मोटरसायकली इत्यादी २८० वाहने जप्त करण्यात आली होती यामध्ये २२६२ वारस गुन्हेच १५५ बेवारस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर २१ ३४ आरोपींना अटक करण्यात आली होती सात कोटी तीस लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला होता .गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यातील दहाव्यांवर बसून दारू पिणाऱ्या वर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकून कारवाई करण्यात आली त्यामध्ये १२ धावा चालक व ६८ मद्यपीना न्यायालयाने दंड ठोठावला आहे.
सोलापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन वर्तनामुळे हातभट्टी दारूचे उत्पादन घटल्याचेही अधीक्षक धार्मिक यांनी सांगितले आहे. गेल्या आठ महिन्यात शहर व जिल्ह्यातील नागरिकांना तब्बल ६२ लाख ८५हजार लिटर देशी दारू ५५ लाख ३१ हजार लिटर विदेशी दारू त्रेचाळीस लाख ७५ हजार लिटर बियर रिचवली आहे. जिल्ह्यात ३२ हजार ताडीची झाडे आहेत .शहरात बिअर शॉपी जवळ पिण्याची व्यवस्था करणाऱ्या २४ बियर शॉपींना प्रत्येकी ५० हजाराचा दंड ठरवण्यात आला असल्याचे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी नितीन धार्मिक यांनी सांगितले.*