*राष्ट्रीय नेते खासदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षात समाधानी आहे:-एकनाथ खडसे*

*राष्ट्रीय नेते खासदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षात समाधानी आहे:-एकनाथ खडसे*

-------------------------------------------------------------------------------

मुक्ताईनगर,(खास प्रतिनिधी):-  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे व शरद पवार यांच्यासह भेट घेणार होते. त्यासाठी खडसे यांनी राजधानी दिल्ली वारी केली परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट होऊ शकली नाही केवळ फोनवरूनच त्यांच्याशी बोलणे झाली असून भाजपा पक्षात ४० वर्षे प्रामाणिक काम केले त्याचे भाजपला मोठ्या प्रमाणात पक्ष वाढीसाठी मदत झाली. पण मध्यंतरीच्या काळात भाजपातील काही नेते मंडळींनी मला ना हा त्रास देऊन मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे मी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला यापुढे भाजपात कधीही जाणार नाही.भाजपात जाणार असलेल्या सर्व वावड्या मुद्दामपणे पसरल्या जात असून त्या पोकळ आहेत. भाजपातून मी तीन वर्षे झाली पंगा घेतलेला आहे. मी अडचणीत असताना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सर्व बाजूंनी आधार दिला. त्यामुळे राष्ट्रवादी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शरद पवारांनी राष्ट्रवादी कोट्यातून माझी विधानपरिषदेसाठी शिफारस केली होती ती नियुक्ती होऊ शकली नाही .आत्ताची मंडळी घाणेरडे राजकारण करीत असल्यामुळे माझ्या आमदारकीला ब्रेक लागला आहे .या पक्षाने मला पुन्हा राजकारणात सक्रिय केलं तो पक्ष सोडून पुन्हा भाजपात जाण्याचा प्रश्नच येत नाही. शरद पवार हाच माझा पक्ष असल्याचे शेवटी एकनाथ खडसे यांनी सांगून होत असलेल्या निरर्थक चर्चेला पूर्णविराम दिला.