स्नेहल बनसोडे युजीसी न्यू दिल्ली नेट परीक्षेत ८७ .७% टक्के गुणांनी उत्तीर्ण

स्नेहल बनसोडे युजीसी न्यू दिल्ली नेट परीक्षेत ८७ .७% टक्के गुणांनी उत्तीर्ण

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज) रयत शिक्षण संस्थेचे संत सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालयातील विद्यार्थिनी स्नेहल गौतम बनसोडे यूजीसी न्यू दिल्ली मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत ८७.%७ गुणाने उत्तीर्ण झाली स्नेहल बनसोडे विद्यार्थी मूळची पंढरपूर तालुक्यातील चिचुंबे येथील रहिवासी असून ती कराड येथील संत सद्गुरु गाडगे महाराज या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे स्नेहल बनसोडे चे वडील हे गौतम बनसोडे प्राध्यापक आहेत, उत्तीर्ण झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला .

यावेळी तिच्या या यशाबद्दल शालेय शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्य फिरोज पाटील, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डॉ. एम बी शेख, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाँडी सदस्य विक्रांत पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या माजी सचिव जे. जे जाधव सर, महाविद्यालयाचे प्राचार्य एल .डी कदम व प्राचार्य व्ही. व्ही किल्लेदार ,कडेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे ,डॉ. एस जी आवळे, डॉ. आर सी पाटील, डॉ. विक्रमसिंह नांगरे ,प्रा. अंकुश घुले , प्रा.विनोद आखाडे, प्रा. समाधान बनसोडे, प्रा.निलेश बनसोडे  डाँ.करीम मुल्ला ,वसंतराव काळे तानाजी जाधव, सिद्धेवाडी ग्रामपंचायत माजी सरपंच गोरख बनसोडे, पोलीस पाटील बाळासाहेब घुले तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.