जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामी बोरगाव येण्यापूर्वी बोरगाव ते माळेवाडी बोरगाव या खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती करा : शिवराम गायकवाड
------------------------------------------------------------------------------------
सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज(PWD) यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दिले निवेदन..!
------------------------------------------------------------------------------------
अकलूज( पंढरी नगरी न्यूज ) : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील बोरगाव गावी मुक्कामी येण्यापूर्वी बोरगाव ते माळेवाडी (बोरगाव) या खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती करा या मागणीचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी मौजे बोरगाव गावी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी मुक्कामी दिनांक 25 जून 2023 रोजी येत आहे सदर बोरगाव पंचक्रोशी मध्ये वारकरी भाविक भक्तांची कायम गर्दी असते सर्वच पंचक्रोशीच्या परिसरात नेहमीच्या ठिकाणी मानाच्या दिंड्या वास्तव्यासाठी असतात तसेच जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळेवाडी बोरगाव या ठिकाणी मानाच्या दिंड्या वास्तव्यासाठी असतात.
बोरगाव ते माळेवाडी (बोरगाव) या रहदारीच्या रस्त्यावर मोठमोठाली खड्डे पडलेले आहेत त्यामुळे ये जा करणेसाठी, वाहतुकीसाठी सदर मार्गावर वारकऱ्यांना,नागरिकांना त्रास होण्याचा संभव नाकारता येणार नाही. सदर रस्त्याची वारकरी, नागरिक, मानाच्या दिंड्या, भक्तगण यांना मोठमोठाल्या खड्यांमुळे गैरसोय होऊ शकते त्यामुळे खड्डेमय रस्त्याची मुरमीकरण करून वारकरी, भाविक-भक्तांची होणारी गैरसोय थांबवावी अन्यथा आषाढी वारी काळात सदर खड्ड्यामध्ये बसून भजन आंदोलन करून आपणाला व संबंधित विभागाला जाग आणण्यात येईल त्यावेळी होणाऱ्या परिणामास संबंधित विभाग जबाबदार करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्ते शिवराम गायकवाड यांनी दिला.