पंढरपूर महसूल विभागाच्या आर्शिवादाने भीमा नदीच्या पात्रातील वाळूची माफिया कडून मोठ्या प्रमाणात तस्करी:-

पंढरपूर महसूल विभागाच्या आर्शिवादाने भीमा नदीच्या पात्रातील वाळूची माफिया कडून मोठ्या प्रमाणात तस्करी:-

…....................................................................................

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी ,आंबे ,चळे, सरकोली या भीमा नदीच्या पात्रातील वाळूची वाळू माफिया कडून मोठ्या प्रमाणात चोरी होत असून याला पंढरपूर महसूल विभागाचे आर्शिवाद असल्याची चर्चा पंढरपूर तालुक्यात सगळीकडे होत आहे.

भीमा नदी काठावर वसलेले मुंढेवाडी, चळे, आंबे, सरकोली या गावामधील असणाऱ्या भीमा नदीच्या पात्रातील वाळूची सध्या मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून वाळू चोरावर सतत कारवाई केली जात असताना पंढरपूर महसूल विभागाचे अधिकारी मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. केवळ वरिष्ठांची पाठ थोपटून घेण्यासाठी व मर्जी सांभाळण्यासाठी  कारवाईचा बनाव केला जात असल्याने या गावामधील नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे सर्वांच्या डोळ्यात देखत दिवसा अपरात्री वाळू उपसा होत असतानाही महसूल विभागाचे अधिकारी मात्र याकडे डोळेझाक करत असल्याने त्यांचे वाळू माफीयांची आर्थिक हित संबंध असल्याची नागरिकांतून चर्चा होत आहे.

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जिल्ह्यात अवैध्य वाळू उपशावर सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली अनेक कारवाई केल्या यामध्ये पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण पोलिसांनी वाळू चोरी माफियावर मोठ्या प्रमाणात कारवाई केल्या मात्र ज्या महसूल विभागाची कारवाई करण्याची सर्वस्वी जबाबदारी आहे हे महसूल विभाग मात्र वाळू चोर माफियाना आर्थिक हित जोपासत आहे. त्याकडे जाणीवपूर्वक झोपेचे सोंग घेत असल्याचे दिसत आहे. तर काही ठिकाणी रावसाहेबांच्या खाली काम करत असलेले भाऊसाहेब हेच (तलाठी )काही गावातील वाळू माफिया कडून आर्थिक देवाणघेवाण व वसुलीतून मिळणारी माया वरपर्यंत पोहच करीत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.

अशा वाळू चोर माफीयावर प्रांत अधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांनी लक्ष घालून चाललेल्या गोष्टीकडे कठोर पावले उचलून वाळू चोर माफिया यांच्यावर कडक कारवाई करून  त्यांच्या मुसक्या आवळण्यात याव्यात अशी मागणी नागरिकातून होत आहे.