छत्रपती शिवाजी महाराज यांनी आठरापगड जातीच्या मावळ्यांना घेऊन स्वराज्याची स्थापना केली-, डॉ. अमित लाड, कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात छत्रपती शिवाजी जन्मोत्सव सोहळा प्रसंगी
-------------------------------------
बार्शी(पंढरी नगरी न्यूज ): अतिशय प्रतिकूल परिस्थितीत छत्रपतींनी अठरापगड जातींच्या मावळ्यांना सोबत घेवून अगदी निश्चियाने अखंड हिंदवी स्वराज्याची स्थापना केली,ही बाब आपल्या सर्वांसाठी भूषणावह व प्रेरणादायीच आहे."असे विचार सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.अमित लाड यांनी व्यक्त केले.अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालय मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
प्रथमतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांचे शुभहस्ते पुष्पहार घालून करण्यात आले. पुढे बोलताना डॉ.लाड म्हणाले,कमी सैन्यबळ व मोजकी संसाधने असताना देखील प्रचंड आत्मविश्वास,ज्वलंत स्वाभिमानाने व मुत्सद्दीगिरीने त्यांनी अनेक गड किल्ले मिळविले,महाराजांच्या प्रत्येक कृतीतून प्रेरणा मिळते आहे,त्यासाठी इतिहासाचे वाचन करणे गरजेचे आहे,आपले वय जेवढे आहे तेवढी पाने तरी किमान रोज वाचन करणे गरजेचे आहे, हीच सवय तुम्हाला यशापर्यंत पोचवू शकेल असं ही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते मा.सुहास सुतार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वृक्षमित्र तथा गायक मा.सुनिल फल्ले हे होते.प्रमुख मान्यवरांनी या औचित्याने आपले मनोगत व्यक्त केले,विशेष बाब म्हणजे बाल वाचक चि.श्लोक व सार्थक मस्के या बंधूही अगदी परखडपणे महाराजांबद्दल आपले विचार व्यक्त केले याचे खूप कौतुक वाटले, यावेळी सोमनाथ गायकवाड, गणेश गादेकर यांचेसह सभासद,बालवाचक उपस्थित होते,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी व्यक्त केले.