खेडभोसे येथील शेतकऱ्यांनी मागितली तहसीलदार कडे आत्मदहनाची परवानगी.

खेडभोसे येथील शेतकऱ्यांनी मागितली तहसीलदार कडे आत्मदहनाची परवानगी.

------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर तहसीलदार आता याबाबत काय? निर्णय घेणार की शेतकऱ्याचा बळी देणार?
------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर(दै पंढरी नगरी न्यूज) : आपल्या शेजारील लोकांनी त्यांच्या जमिनीतून येण्या- जाण्यास रस्ता असतानाही खोडसाळपणे तहसीलदार  यांच्याकडे रस्ता मागणी अर्ज करून प्रशासनास खोटी माहिती देऊन दिशाभूल करून बेकायदेशीररित्या शेतात अतिक्रमण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करून सदर घटनेमुळे कुटुंबीयांची अत्यंत शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास होत असल्याने आम्हास जगणे मुश्किल झाले असल्याने आम्हा कुटुंबीयांना आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याची परवानगी मिळावी अशी विनंती खेडभोसे येथील रामचंद्र ज्ञानोबा पवार यांनी निवेदनाद्वारे पंढरपूर तहसील कार्यालयाकडे केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत रामचंद्र पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काळात रस्त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांसमोर तडजोड करून सदरचा रस्ता हा आमच्या जमिनीच्या पूर्वेकडील शेत जमिनीमधून ठेवण्याचे ठरले असतानाही रस्ता वहिवाटीस चालू असतानाही लक्ष्मण पवार यांनी मुद्दामहून १५ गुंठे ऊस शेतात शिल्लक ठेऊन रामचंद्र पवार यांच्या शेतात ऊस नेण्यासाठी परवानगी अर्ज केला होता.

याबाबत प्रशासनाने फक्त ऊस कारखान्यास पाठवण्या पुरतीच परवानगी दिली असताना प्रशासनाविरोधात उपोषण करून शेतातून कायमचा रस्ता करण्यासाठी प्रयत्न होत असल्याने आम्हा कुटुंबीयांना शारीरिक मानसिक आर्थिक त्रास दिला जात असल्याने आम्हास जगणे मुश्किल झाले असल्याने आपले कार्यालयासमोर आत्मदहन करण्यास परवानगी मिळावी अशी विनंती खेडभोसे येथील ज्येष्ठ नागरिक रामचंद्र ज्ञानोबा पवार यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

याबाबतचे पत्र उपविभागीय अधिकारी व करकंब पोलीस प्रशासनाकडे पाठवले असल्याचे पवार यांनी सांगितले आहे. मात्र आत्मदहन करण्यास परवानगी मागितल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आता याबाबत महसूल विभागाचा निर्णय पंढरपूरचे तहसीलदार यांच्याकडे असल्याने ते या प्रकरणाकडे गांभीर्याने घेणार की? हे प्रकरण वेळ मारून नेणार की ?बळी घेणार ?याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.