राज्य सरकारकडे ग्रंथालये अनुदानाची ३० कोटीची फाईल मंजुरी अभावी प्रलंबित..
******************************************************
पंढरपूर(प्रतिनिधी):- राज्यातील बारा हजार १४५ ग्रंथालयात २१ हजार ६१५ ग्रंथालय कर्मचारी काम करतात सण २०-२२-२३ या वर्षातील सप्टेंबर महिन्यात मिळणारे पहिल्या हप्त्याची रोहित ३० कोटी अनुदान तसेच ६०% वाढीव अनुदानाची फाईल राज्य चे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक महिन्यापासून मंजुरीसाठी प्रलंबित आहेत .या फाईल कडे पाहण्यास उपमुख्यमंत्री यांना वेळ नसल्याची टीका महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे पुणे विभागाचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी केली आहे.
सन २०१४ ते २०१९ या पाच वर्षाच्या तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ६०% अनुदानाची घोषणा २५ जून २०१९ रोजी विधिमंडळात केली होती .तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतले असते तर तेव्हा शासन निर्णय झाला असता असे बेडगे यांनी म्हटले आहे.
राज्यातील २१ हजार ६१५ ग्रंथालय कर्मचाऱ्यापैकी ८०% टक्के ग्रंथालय कर्मचारी यांना शासनाचे अनुदान वितरित केल्यावर त्यांना वेतन मिळते सध्या दिवाळी सण जवळ आला असल्यामुळे अर्थमंत्री यांना ग्रंथालय अनुदान फाईल मंजूर करण्यासाठी लक्ष देणार का असा प्रश्न राज्यातील ग्रंथालयाचे कर्मचारी मध्ये उपस्थित केला जात आहे.
राज्यातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांना तटपुंज वेतन मिळत असल्याने शासनाने वेळेत अनुदान व्यतिरिक्त केले तर त्यांच्या प्रपंचिक जीवनात अडचणी काही ज्या प्रमाणात सुटतील तरी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अनुदानाची फाईल विना विलंब मंजूर करून ग्रंथालय अनुदान वितरित करण्याचा निर्णय घेण्यात यावा .अशी मागणी महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघाचे पुणे विभागाचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी केली आहे.