मंगळवेढा पोलीस ठाणेची कामगिरी ,मंगळवेढा पोलीसांनी अवैध्य दारू भटटीवर कारवाई करून ५, ०७८५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पकडला.

मंगळवेढा पोलीस ठाणेची कामगिरी ,मंगळवेढा पोलीसांनी अवैध्य दारू भटटीवर कारवाई करून ५, ०७८५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पकडला.

------------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा प्रतिनिधी  (पंढरी नगरी न्यूज) मंगळवेढा तालुका पोलीस स्टेशन कार्यालयाकडून माहिती कळविण्यात येते की दि.०९/०६/२०२३ रोजी  पोलीस निरीक्षक, रणजित माने  यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे उचेठाण, ता. मंगळवेढा, जि. सोलापुर येथील जगताप वस्तीवर अक्षय बनसोडे याचे शेताचे खालील बाजुस माण नदीकाठी काही लोक हे अवैधरित्या हातभटटी दारू काढत असल्याची माहिती मिळाल्याने लागलीच दोन इसमांना पंच म्हणुन बोलावून बातमीताल आशय सांगुन ते पंच म्हणून येण्यास तयार झाल्याने पोलीस उपनिरीक्षक शेटे, पोहेकॉ / ९०५ कोळी, पोना / १२५५ विभुते, पोना / ९२६ जाधव, पोकों / २१३८ मिसाळ, पोकों/ ८२५ आवटे असे खाजगी वाहनाने सदर बातमीचे ठिकाणी गेलो व वाहनातुन उतरून काही अंतरावर चालत गेलो असता मौजे उचेठाण, ता. मंगळवेढा, जि. सोलापुर येथील जगताप वस्तीवर अक्षय बनसोडे याचे शेताचे खालील बाजुस माण नदीकाठी गेलो असता तेथे विदयुत प्रकाशात पाच लोक दिसले व त्यातील एक इसम प्लॅस्टिकचे बॅरलमध्ये लाकडाने काहीतरी ढवळत असलेचे दिसले व इतर ०४ इसम त्यास मदत करत असलेचे दिसले. आंम्हास त्यांचा बेकायदेशिर विषारी दारूबाबत संशय आलेने त्यांना गराडा घालुन जागीच पकडले ती वेळ २२.३० वा. होती.

सदर ठिकाणी प्लॅस्टिकचे बॅरलमध्ये ढवळत असलेल्या असलेल्या इसमास त्याचे नाव, पत्ता विचारता त्याने त्याचे नाव रणजित विलास गायकवाड, रा. सोनके, ता. पंढरपुर, जि. सोलापूर असे सांगितले असता त्यास सदर ठिकाणी काय करत आहे असे विचारले असता त्याने त्याचे साथीदारांसह सदर ठिकाणी गावठी दारू बनवत असलेचे सांगितले. सदर ठिकाणी उभ्या असलेल्या त्याचे साथीदारांना त्यांची नावे विचारता त्यांनी त्यांचे नावे १. पंकज विजयकुमार जाधव, रा. कासेगाव, ता. पंढरपुर, जि. सोलापुर, २. तानाजी बाळु सलगर, रा. सोनके, ता. पंढरपुर, जि. सोलापुर, ३. सारंग पोपट भोसले, रा. सोनके, ता. पंढरपुर, ४ हणमंत श्रीकांत जाधव, रा. रविवार पेठ, सोलापर असे असलेचे सांगितले. रणजित गायकवाड व त्याचे साथीदार ढवळत असलेले बॅरल पंचासमक्ष तपासुन पाहीले असता त्यात खालील प्रमाणे मुदेमाल मिळून आला त्याचे वर्णन खालील प्रमाणे. ०१) २२,५००/- रू. किमतीचे तिनशे लिटर क्षमतेचे ०३ प्लॅस्टिक बॅरल त्यामध्ये एकुण ९०० लिटर

हातभटटीसाठी लागणारे उग्र आंबट घाण वासाचे नवसागर, युरीया, बॅटरीचे सेलचे तुकडे,

कुजका गुळमिश्रीत रसायन प्रती लिटर किंमत २५ रु. प्रमाणे

२) २५,०००/- रु. किंमतीची एका प्लॅस्टिक बॅरलमध्ये अंदाजे २५० लिटर तयार गावठी हातभटटीची दारून

किंमत प्रतिलीटर १००/- रु. प्रमाणे.

३) ३५०/- रु. किंमतीचे एका सफेद रंगाचे पिशवीत अंदाजे १० किलोग्रॅम नवसागर प्रति किलो किंमत

३५/- रु. प्रमाणे. . किंमतीची एक पांढऱ्या रंगाची चारचाकि फियाट कंपनीची मोटार कार तिचा आर टी ओ क. एम एच ०४ एफ ए ७२४४ जुनी वापरती किंमत अंदाजे असून मंगळवेढा सर्व तालुक्यात अशा पोलीस निरीक्षक रणजीत सिंह माने व त्यांच्या सहकार्यानी धाडसी कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले असून अशा अनेक कारवाया सतत केल्यामुळे पोलीस दादांचे सर्वत्र कौतुक होत आहे.