जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत गादेगाव शिवरत्न ज्युनिअर कॉलेजने पटकावला दुसरा क्रमांक
--------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (दै. पंढरी नगरी न्यूज ) : पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शिवरत्न ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत ज्युनिअर कॉलेज १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या व मुलींच्या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये दुसरा क्रमांक पटकावला .
बार्शी येथे पार पडलेल्या या स्पर्धेमध्ये जवळपास ४० हून अधिक संघाने सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धा ही अत्यंत चुरशीची व अटीतटीची झाली. या स्पर्धेमध्ये शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगाव मधील १७ वर्षे व १९वर्ष वयोगटातील विद्यार्थी सहभागी झाले होते. १९वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी आपल्या खेळाच्या जोरावर दुसरा क्रमांक पटकावला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आट्यापाट्या असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कापसे व उपसरपंच संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी अभिनंदन केले. सदर टीमला दत्ता झांबरे ,मल्हारी भुसनर, सचिन कदम यांनी कोच म्हणून काम पाहिले. शिवरत्न च्या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
प्रशालेचे सहशिक्षक राजेंद्र मोलाने ,नागेश कांबळे ,दीपक देशमुख, नियाज मुलानी, सोमनाथ भोईटे, शितल मस्के ,शितल बागल, अजय मोरे, लीना बागल, प्राजक्ता मस्के ,व सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले .