*विठ्ठल रुक्मिणी मंदिरात,रुक्मिणी माता नवरात्र संगीत महोत्सवाचे आयोजन:-*

*विठ्ठल रुक्मिणी मंदिरात,रुक्मिणी माता नवरात्र संगीत महोत्सवाचे आयोजन:-*

------------------------------------------------------------------------------


पंढरपूर प्रतिनिधी:- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने रुक्मिणी माता नवरात्र संगीत महोत्सवाचे दिनांक .२७ सप्टेंबर ते दि. ४ ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व सर्व सदस्य मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली व अधिकारी यांच्या अथक परिश्रमातून दिनांक. २७ सप्टेंबर ते दि. ४ ऑक्टोबर दरम्यान रात्री ७:३० ते १०:०० या वेळेस संत तुकाराम भवन येथे आयोजन करण्यात आले आहे.

या संगीत महोत्सवामध्ये शास्त्रीय गायन अभंग अभंग वाणी भावगीत भक्ती गीते इत्यादी मैत्रीची सत्य सुरांची बहारदार ऐकली जाणार असून दिनांक. २७ रोजी छतम गायिका विदुषी मंजुषा पाटील यांचे शास्त्रीय उपशास्त्रीय अभंग गायन दिनांक .२८ रोजी अर्पणा केळकर व संजय गरुड यांचे अभंग वाणी दिनांक. २९ रोजी तेजोमय नादब्रह्मा पद्माकर कुरकुटे .राधा घोसरवाडकर यांचे भावगीत भक्तीगीत गायन तर दिनांक. ३० रोजी छतम गायक धनंजय जोशी नांदेड यांचे शास्त्रीय उपशास्त्रीय अभंग तसेच दि.२ ऑक्टोबर रोजी स्थानिक कलाकार सुशील कुलकर्णी यांचा महिपत सप्तसुरांची हा कार्यक्रम होणार आहे. दिनांक ४ऑक्टोबर रोजी गदिमा, बाबूजी आणि मंगेशकर परिवाराने अजरामर केलेल्या गीतांचा आनंद माडगूळकर, राधा मंगेश कर, मनीषा निश्चल, जितेंद्र अभ्यंकर, यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .

या कार्यक्रमाला प्रशांत पांडव, ज्ञानेश्वर दुधाने, केदार परांजपे, अजय अतुल, प्रसन्न बाम, अपुरा द्रविड, निलेश देशपांडे, कौशिक केळकर,  मीना देशपांडे, माधव नेहमी, प्रशांत गाजरे, ऋषिकेश फरांडे, ऋतिक कुरणे, रमजान बाले खान, रोहन शेटे, अभिनय रवंदे अक्षय तळेकर  आदींची उपस्थिती लागणार आहे.

तरी पंढरपूर व पंचक्रोशीतील कला रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचे आवाहन करण्यात आले आहे .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांचे पदाधिकारी  अधिकारी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.