नंदुर येथील अवताडे शुगर अँड डिस्टिलरीचा प्रथम बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ शुक्रवारी दि.२१ रोजी.

नंदुर येथील अवताडे शुगर अँड डिस्टिलरीचा प्रथम बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ शुक्रवारी दि.२१ रोजी.

_____________________________________________________

मंगळवेढा( प्रतिनिधी ): नंदुर येथील अवताडे शुगर अँड डिस्टलरीजचा पहिला बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ आज शुक्रवार दिनांक २१/१०/२०२२रोजी सकाळी ११:२५ मि.या शुभ मुहूर्तावर आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन संजय अवताडे यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्यातील कर्नाटक सर हद्दीवर असणाऱ्या नंदुर येथील अवताडे शुगर अँड डिस्टलरजीचा प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ सिद्धापूर येथील शेतकरी व प्रगतशील बागायतदार आण्णाप्पा शंकराप्पा काकणगी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार असून मंगळवेढा येथील श्री संत दामाजी देवस्थान संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत महादेव अवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील कारखाना कार्यस्थळावर होणार असून या बॉयलर हंगामाच्या कार्यक्रमास कारखाना पंचक्रोशीत केली शेतकरी वाहन मालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहन पिसे यांनी केले.