सोलापूर शिवसेनेचे संभाजी शिंदे या जिल्हाप्रमुखांना गुन्ह्यात अडकवणे हे तर शिंदेगटाचे षडयंत्र.. - प्रवक्ते ,- रणजित बागल यांचा आरोप

सोलापूर शिवसेनेचे संभाजी शिंदे या जिल्हाप्रमुखांना गुन्ह्यात अडकवणे हे तर शिंदेगटाचे षडयंत्र.. -  प्रवक्ते ,- रणजित बागल यांचा आरोप

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांचेवर काही दिवसांपुर्वीच पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेले आठवडाभरापासून या गुन्ह्यामुळे तालुक्याचे लक्ष वेधले गेले आहे. आता याबाबत ठाकरे गटाचे युवानेते रणजित बागल यांनी माध्यमांसमोर बाजु मांडली आहे.

यावेळी बोलताना बागल म्हणाले की, "संभाजी शिंदेसारख्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यास आपल्या गटात घेण्यासाठी अनेक दिवसांपासून शिंदे गटाचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक वेळा अनेक माध्यमातून त्यांना ऑफर देण्यात आल्या परंतु त्या ऑफर संभाजी शिंदे यांनी धुडकावून लावत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काम सुरूच ठेवले आहे. यामुळे शिंदेगट चिडुन आहे म्हणून नाना प्रकारे दबाव शिंदेंवर टाकण्यात येत आहे, सरकारी यंत्रणेचा वापर करून दडपशाही सुरू आहे,त्याचाच एक भाग हा गुन्हा म्हणावा लागेल असे बागल म्हणाले. पुढे बोलताना बागल म्हणाले, हा गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित आहे, जिल्हासंपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांचे मार्गदर्शनात जिल्ह्यात शिवसेना (उबाठा) करत असलेली घौडदौड थांबवण्यासाठीचा हा एक रडीचा डाव आहे, शिंदे गट याना त्या कारणांनी दबावाचे व कुटील राजकारण करत आहे, असे दडपशाहीचे राजकारण अजिबात चालु देणार नाही, शिंदे गटाने राजकारण न करता हिंमत असेल तर सरकार म्हणून प्रशासनास आदेश देवुन गुन्ह्यातील सत्यता समोर आणावी मग "दुध का दुध आणि पाणी का पाणी" झाल्याशिवाय राहणार नाही.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात सुरू असलेले हे राजकारण गलिच्छ असुन राजकीय रंग देवुन पदाधिकाऱ्यांवर पक्षात येण्यासाठी दबाव टाकण्याची पध्दत चुकीची आहे, दबावतंत्राचा अवलंब करून सत्तेचा गैरवापर करत शिंदे यांना अडवण्याचा प्रयत्न आहे परंतु संपुर्ण शिवसेना खंबीरपणे संभाजी शिंदे यांचे पाठिशी आहे असेही बागल यावेळी म्हणाले.