भंडीशेगाव येथे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे "गाव चलो अभियानास, नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
_______________________________________________
पंढरपूर ( पंढरी नगरी न्यूज ) सोलापूर विधान परिषद मतदार संघाचे माजी आमदार तथा श्री .पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी भाजपच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध विकास योजनांची माहिती गाव वाडी वस्तीवर पर्यंत पोहोचवण्यासाठी माढा, लोकसभा, सांगोला विधानसभा मतदारसंघातील भंडीशेगांव (ता. पंढरपूर) "गाव चलो अभियान" सुरुवात करण्यात आली.

भंडीशेगाव येथील चव्हाण वाडी वस्तीवर ❝गाव चलो अभियानाचे स्वागत ❞ करून सुरुवात करण्यात आली ग्रामस्थांच्या वतीने माजी आमदार प्रशांत परिचारक परिचारक व भाजपा पदाधिकाऱ्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत भाजपा सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. तेथील शेतकऱ्यांना सर्व योजनेचा लाभ मिळत असल्याचे सांगून शेतकरी बांधव यांच्यातील आनंदाचं वातावरण पाहून अजून काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती येथे ही माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आवर्जून भेट देऊन विद्यार्थी व शिक्षक यांच्याशी संवाद साधला यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.