विभागीय आयुक्त यांच्या आदेशाच्या अमंलबजावणीसाठी टाळा टाळ, आम आदमी पार्टीचे तहसिलदार यांचे विरूध्द मंगळवेढयात आंदोलन सुरू

विभागीय आयुक्त यांच्या आदेशाच्या अमंलबजावणीसाठी टाळा टाळ,  आम आदमी पार्टीचे तहसिलदार यांचे विरूध्द  मंगळवेढयात आंदोलन सुरू

---------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा पंढरी नगरी (न्यूज ) : मंगळवेढ्याचे महसूल प्रशासन हे पुणे विभागीय आयुक्त यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत नसल्याने त्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी झाडू सेना जिल्हाध्यक्ष नागेश पवार यांनी मंगळवेढा तहसिल कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत  तहसिलदार विरूध्द आंदोलन सुरु केले आहे.

मौजे बोराळे येथील गट नं.58 च्या पोटहिश्याची मो.र.नं.155 ची मोजणी झाली असून यामध्ये 58/ 1/1 सिद्राम बाबू गुजले,58/1/ 2 पुनर्वसन जिल्हाधिकारी सोलापूर,58/1/3 महाराष्ट्र सरकार असे गट पडले असनू सदर आकारफोड आदेशामधील चूक दुरुस्ती करण्यासाठी 58/1/1 सिद्राम बाबू गुजले व इतर दोन गटाची 58/1/2,58/1/3 याची नोंद घेण्यासाठी तलाठी यांना पत्र काढले असून तलाठी गायकवाड यांनी तिन्ही गट ऑनलाईन थंब घेण्यासाठी पाठविले असतानाही आजतागायत आकार कोड आदेशाचा अंमल झालेला नाही.

याबाबत प्रांताधिकारी मंगळवेढा यांच्याकडे अर्ज करुनही तहसिलदार यांनी आकार कोड आदेशाचा अंमल केला नाही. परिणामी तहसिलदार यांच्यावर दफ्तर दिरंगाईची कारवाई करण्यात यावी अशी आंदोलकांची मागणी आहे. पुणे विभागीय आयुक्त यांच्याकडे दि.17 नोव्हेंबर 2017 पासून पत्रव्यवहार करुन देखील मंगळवेढा प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने आम्हांला आंदोलनासारखे मार्ग नाईलाजाने स्विकारावे लागत आहेत असे आंदोलकांचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यानंी सबंधितांची विभागीय चौकशी करुन त्यांच्यावर तात्काळ कारवाई जो पर्यंत होत नाही तोपर्यंत तहसिल कार्यालयासमोरील आंदोलन मागे घेतले जाणार नाही असा गांभीर्यपुर्वक इशारा आम आदमी पार्टीचे नागेश पवार यांनी प्रशासनास दिला आहे.