आमदार समाधान आवताडे यांचा पंढरपुर शहरात विकास कामाचा धडाका, शिवपार्वती नगरातील गणेश सभामंडपाचा लोकार्पण
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांचे आमदार निधीतून स्थानिक विकास२०२२/२३ कार्यक्रमांतर्गत पंढरपूर येथील शिवपार्वती नगरातील दैवत गणेश मंदिराच्या समोर मंजूर झालेल्या गणेश मंदिर सभामंडपाचे बांधकाम काम नुकतेच पुर्ण झाल्याने
आज सभामंडपाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आमदार समाधान आवताडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की, शिवपार्वती नगरातील दैवत गणेश मंदिर येथे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ पाहता ही सभामंडप वास्तू अतिशय गरजेची होती.त्यामुळे स्थानिक सामाजिक, सांस्कृतिक व सांप्रदायिक कार्यक्रमांचे आयोजन आणि नियोजन होण्यासाठी माझ्या विकास निधीच्या माध्यमातून साकार होणारी ही वास्तू नगराचे वैभव नक्की वाढवेल असा विश्वास आमदार आवताडे यांनी व्यक्त केला.
यावेळी पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष सुधीर भोसले, माजी नगराध्यक्षा साधना भोसले, नगरसेवक प्रशांत शिंदे, मंजुश्री भोसले, दत्तू सर, राजूरकर साहेब, महादेव जेधे सर, शरीफ भाई शेख,विनोदराज लटके,संतोष डोंगरे,बापुसो गोडसे, राहुल गावडे,सोपान काका देशमुख, प्रथमेश बागल,स्वप्नील गायकवाड,रणजित पवार, रवी सुर्वे तसेच
भाजपाचे पदाधिकारी, सदस्य , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.