*खा .शरद पवार यांना दिले दोन डझन आंब्याचे खोके देऊन प्रा .मारुती जाधव झाले ओके:-*
________________________________
*पंढरपूर,(प्रतिनिधी):-* राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मारुती जाधव यांनी देशाचे माजी कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांना केशर आंबा या झाडा पासून विकसित केलेल्या आंब्याचे नाव शरद अंबा ठेवले असून त्याचे दोन डझन असलेले खोके देऊन ओके झाले असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आज दिवसभर होत होती.
खासदार शरद पवार हे माढा तालुक्याचे पहिले आ.कै.विठ्ठलराव शिंदे यांच्या कुर्डूवाडी येथे पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून पुतळ्याच्या उद्घाटन प्रसंगी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला
होता.या शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी पंढरपूर तालुक्यातील पळशी येथील प्रगतशील शेतकरी व खासदार शरद पवारांचे विश्वासू कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किसान सेल चे प्रदेश सरचिटणीस प्रा.मारुती जाधव यांच्या शेतातील केशर आंब्याची बाग असून आंबा झाडावर नवीन प्रयोग विकसित करून त्यापासून शरद आंब्याची जात विकसित केली आहे. ती डबल हंगामात येत असून ती पावसाळ्या हंगामात आलेल्या शरद आंब्या या वानाची पेटी प्राध्यापक मारुती जाधव यांनी शेतकरी मेळाव्यास व्यासपीठावर सर्वांच्या साक्षीने खासदार पवार यांना सुपूर्द केली.
यावेळी खासदार शरद पवार यांनी आंब्याच्या झाडा बद्दल अधिक माहिती जाणून घेतली असता हा आंबा पावसाळी हंगामात कसा काय येतो असा प्रश्न विचारत त्यास कोणकोणती खते वापरली आहेत. यावर आधारित मारुती जाधव यांनी या आंबा झाडाला फक्त सेंद्रिय पद्धतीने खते वापरून आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात पिक घेत असल्याचे सांगताच पवारांनी सेंद्रिय शेती बाबत समाधान व्यक्त केले. यावेळी बीड येथील माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शरद आंबा या वाणा विषयी माहिती जाणून घेऊन पावसाळा हंगामात आपल्या बागेस भेट देणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
यावेळी माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे, आमदार अरुण लाड, माजी आमदार विनायकराव पाटील, वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, सभापती विक्रम सिंह शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, वैराग चे राष्ट्रवादीचे नेते निरंजन भूमकर, इत्यादी हजारो शेतकरी व कार्यकर्ते मेळाव्याला उपस्थित होते.