लातूरच्या आरसीसी क्लासेसचे प्रा. शिवराज मोठे गावकर यांची शिवरत्न ज्युनिअर कॉलेज सदिच्छा भेट

लातूरच्या आरसीसी क्लासेसचे प्रा. शिवराज मोठे गावकर यांची शिवरत्न ज्युनिअर कॉलेज सदिच्छा भेट

_____________________________________________________

पंढरपूर (प्रतिनिधी ) : लातूर येथील नामांकित आरसीसी क्लासेस चे  मार्गदर्शक  प्रा. शिवराज मोटेगावकर सर यांनी आज शिवरत्न ज्युनिअर कॉलेज गादेगाव येथे सदिच्छा भेट दिली .महाराष्ट्रभर ज्यांच्या क्लासेसची ओळख आहे अशा क्लासेसचे मोटेगावकर सर यांनी शिवरत्न मधील ११ वी १२ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी विद्यार्थ्यांमधील अडचणी बद्दल माहिती घेतली.अभ्यासाचे नियोजन कसे करावे कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले .यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना विविध प्रश्नावरती बोलत होते. विद्यार्थी दशेमध्ये आपल्या जबाबदाऱ्या ओळखून आपण वागलं पाहिजे आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे मोल केले पाहिजे अशी भावना यावेळी मोटेगावकर यांनी व्यक्त केली .

यावेळी पालक वर्ग तसेच शिवरत्न मधील शिक्षक वर्ग उपस्थित होता. यावेळी मोटेगावकर सर यांचा शिवरत्न ज्युनिअर कॉलेजच्या वतीने संस्थापक अध्यक्ष उपसरपंच गणपत मोरे व वर्षा मोरे सरांनी त्यांचा विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार केला.

यावेळी पालक प्रतिनिधी पद्माकर बागल,अरविंद बागल, दिलीप बागल ,प्रवीण मोरे, एबीएन क्लासेसचे भारत बागल ,सहशिक्षक दीपक देशमुख, नागेश कांबळे, दस्तगीर शेख ,नियाज मुलानी, राजेंद्र मोलाणे ,सोमनाथ भूईटे,बबलू मोरे ,अजय मोरे आदी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. त्याचबरोबर त्यांनी गादेगाव येथील ऐतिहासिक वेस व ग्रामपंचायतला सदिच्छा भेट दिली .यावेळी त्यांनी गावातील वेशीबद्दल व स्वातंत्र्यसैनिकांबद्दल आदर व्यक्त केला. यावेळी त्यांनी उद्योगपती पद्माकर  बागल यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी शैक्षणिक बाबींवर चर्चा झाली.