*शिरगाव ते एकलासपूर डांबरीकरण रस्त्याच्या कामाला निधी कमी पडू देणार नाही:- चेअरमन प्रशांतराव परिचारक यांची माहिती.*
———————————————————————————————पंढरपूर (प्रतिनिधी):- शिरगाव ते एकलासपूर या चार किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी सरकारकडे पाठपुरावा करून या रस्ते डांबरीकरण रस्त्याचे काम तातडीने मंजूर करुन आणल्याचे सांगून या रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही सोलापूर विधान परिषदेचे माजी सदस्य आ. प्रशांत परिचारक यांनी दिली.
ते आज शिरगाव ते एकलासपूर या चार किलोमीटर रस्त्याच्या कामाचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले त्याप्रसंगी बोलत होते. यावेळी पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे मा. व्हाईस चेअरमन तथा कासेगाव जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रशांत परिचारक म्हणाले या रस्त्यासाठी शासनाकडून दीड कोटी रुपये मंजूर करून आणल्याचे सांगितले.यामुळे भागातील नागरिक विद्यार्थी आणि शेतकरी यांची रस्त्याच्या कामासंदर्भात होत असलेली गैरसोय आता डांबरीकरण रस्त्यामुळे दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सोमनाथ अवताडे, पांडुरंग परिवाराचे युवक नेते प्रणव परिचारक शिरगाव, ग्रा.पं सरपंच धनाजी माने ,उपसरपंच दादा घाडगे, सिद्धेवाडी ग्रा.पं.सरपंच सारंग जाधव,पंढरपूर कृषीउत्पन्न बाजार समिती मा.संचालक, दत्ता ताड, प्राथमिक शिक्षक संघाचे नेते, शिवाजीराव ताड, ग्रा.पं.सदस्य, डॉ. विठ्ठल जाधव, सोसायटीचे चेअरमन दिगंबर घाडगे, तंटामुक्तीचे मा.अध्यक्ष दादा घाडगे, नेपतगाव वि.सो. चेअरमन महादेव सलगर, अनवली चे माजी सरपंच बुवा नाना शिंदे, पांडुरंग कारखान्याचे माजी संचालक नागनाथ शिंदे, छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण घाडगे, अविनाश मोरे, पांडुरंग कारखान्याचे माजी संचालक सिताराम भाऊ नागणे, रमेश घाडगे, संदिपान वाडेकर, रावसाहेब घाडगे, सतिश घाडगे, विक्रम वाडेकर, अजित घाडगे समाधान वाडेकर, ज्ञानेश्वर वाडेकर समाधान गायकवाड, इत्यादी या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.