पंढरपूरात नामांकित हॉटेल सुरमई चे मोठ्या थाटामाटात उद्धाटन..

पंढरपूरात नामांकित हॉटेल सुरमई चे मोठ्या थाटामाटात उद्धाटन..

*******************************************************

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपुरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या हॉटेल सुरमई या फॅमिली रेस्टॉरंट उद्घाटन समारंभ पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष व पंढरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन नागेश भोसले व पांडुरंग परिवाराचे युवक नेते प्रणव परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत  करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यस्थानी पंढरपूर विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे होते यावेळी विक्रम कदम म्हणाले की आजच्या पिढीतील तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या पायावर उभे राहून उद्योग व्यवसाय कडे वळून समाजात कोणत्या गोष्टीकडे लोकांचा कल आहे. त्याकडे जास्त लक्ष देऊन तो व्यवसाय करून त्यांना दर्जेदार व रुचकर दर्जेदार नवनवीन पदार्थांची मेजवानी करण्यात यावी तरच व्यवसायाला चालना मिळणार असल्याचे डीवायएसपी विक्रम कदम यांनी सांगितले.

व्यावसायिक हॉटेल सुरमई चे मालक सागर लवटे यांनी नवीन कराड नाक्यावर. कराड रोड जे डी पाटील यांच्या बंगल्यासमोर या नामांकित हॉटेलचे प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी पंढरपूर विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम. पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, प्रणव परिचारक,व मा.नगरसेवक सचिन कुलकर्णी, आदित्य फत्तेपूरकर, इ. प्रमुख मान्यवरांचा सत्कार हॉटेलचे मालक सागर लवटे यांनी शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.

कार्यक्रमास हॉटेल सुरमई चे मालक सागर लवटे. भारत लवटे. दैनिक पंढरी नगरी न्युज चैनल चे उपसंपादक प्रतापसिंह खंडागळे. संतोष डोंगरे. समीर शेरकर .प्रितम कुलकर्णी .शंकर गायकवाड. मारुती शिंदे. सुदाम चव्हाण .टाकळी ग्रामपंचायतचे सदस्य सागर कारंडे .विकास लवटे. अमित लवटे .महेश हाके. इत्यादी प्रमुख उपस्थित होते.