*ज्ञानदीप संकुलात हिंदी राष्ट्रभाषा दिन साजरा :*

*ज्ञानदीप संकुलात हिंदी राष्ट्रभाषा दिन साजरा :*

*पंढरपूर (प्रतिनिधी):-* ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 14 सप्टेंबर हा दिन हिंदी राष्ट्रभाषा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना सलगर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांची मनोगते यामधून विद्यार्थ्यांनी हिंदी राष्ट्रभाषा दिवसाचे महत्त्व विशद केले.काही विद्यार्थिनींनी हिंदी कविता गायन करून कार्यक्रमात शोभा वाढवली.हिंदी विषय शिक्षक संतोष सोनवले यांनी हिंदी भाषेचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना मेटकरी यांनी केले.  सूत्रसंचालन शाहीन तांबोळी यांनी केले. आभार अकिब मुजावर यांनी मानले. हिंदी राष्ट्रभाषा दिनाच्या निमित्ताने विषय  शिक्षक संतोष सोनवणे व शिक्षिका अर्चना मेटकरी यांचा पुष्पगुच्छ देऊन ज्ञानदीप प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अर्चना सलगर यांनी सन्मान केला.