पंढरपूर मार्केट कमिटीचे सदस्य शिवदास ताड गुरुजी यांचा सिद्धेवाडीत सत्कार..
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज) पंढरपूर तालुक्यातील एकलासपूर येथील शिवदास वामन ताड (गुरुजी) यांची नुकतीच पंढरपूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार पर सन्मान करण्यात आला. यावेळी कडेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व सिद्धेवाडी चे सुपुत्र पांडुरंग भोपळे, नेपतगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक आनंद भोपळे ,सतीश पाटील, एकलासपूर ग्रामपंचायत उपसरपंच व नवउद्योजक पै. नितीन ताड उपस्थित होते.
पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य शिवदास ताड गुरुजी हे एकलासपूर येथील रहिवाशी असून ती आपल्याच गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माजी मुख्याध्यापक म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने काम पाहिले होते त्यामुळे सेवेत असताना कार्याबद्दल त्यांचा शिक्षण विभागाकडून तसेच सामाजिक संघटना कडून गौरव ही करण्यात आला होता .शिवदास ताड गुरुजी हे स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक ते विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचे खंदे समर्थक म्हणून कासेगाव गटात परिचित होते. त्यांनी शिक्षक सेवेत असताना पंढरपूर तालुक्यात राज्याचे माजी शिक्षक आमदार स्वर्गीय शिवाजीराव पाटील प्राथमिक शिक्षक संघटनेचे या गटाचे काम करून प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याचे नेते बाळासाहेब काळे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना मजबूत करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता त्यामुळे त्यांची राजकीय, सामाजिक व प्राथमिक शिक्षकांमधून एक वेगळीच ओळख निर्माण झाली होती.